Penny Stock : कंपनीला झाला ४३६ टक्क्यांचा नफा; शेअर अवघ्या दीड रुपयांचा, खरेदीसाठी अक्षरश: झुंबड
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Penny Stock : कंपनीला झाला ४३६ टक्क्यांचा नफा; शेअर अवघ्या दीड रुपयांचा, खरेदीसाठी अक्षरश: झुंबड

Penny Stock : कंपनीला झाला ४३६ टक्क्यांचा नफा; शेअर अवघ्या दीड रुपयांचा, खरेदीसाठी अक्षरश: झुंबड

Published Oct 16, 2024 03:39 PM IST

Penny Stocks : तिमाही निकालाच्या जोरावर टीमो प्रॉडक्शन्स एचक्यू लिमिटेड या छोट्या शेअरनं गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

कंपनीला झाला ४३६ टक्क्यांचा नफा; शेअर अवघ्या दीड रुपयांचा, खरेदीसाठी अक्षरश: झुंबड
कंपनीला झाला ४३६ टक्क्यांचा नफा; शेअर अवघ्या दीड रुपयांचा, खरेदीसाठी अक्षरश: झुंबड

Penny Stocks : टीमो प्रॉडक्शन्स एचक्यू लिमिटेड हा चिमुकला शेअर खरेदी करण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली आहे. या शेअरला आज ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं असून इंट्राडेमध्ये तो १.४८ रुपयांवर पोहोचला. सप्टेंबरच्या तिमाहीचे निकाल कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीला कारणीभूत ठरले आहेत.

सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत टीमो प्रॉडक्शन्स एचक्यू लिमिटेडनं जबरदस्त नफा कमावला आहे. या कालवाधीत कंपनीनं ४३६ टक्के निव्वळ नफ्याची नोंद केली आहे. त्याचं प्रतिबिंब शेअर बाजारात उमटलं आहे.

कंपनीच्या नफ्यात सातत्यानं वाढ

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ४३६ टक्क्यांनी वाढून १.५ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ०.२८ कोटी रुपये होता. चालू वर्षीच्या जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १.४७ कोटी रुपये होता. त्या तुलनेत सप्टेंबरच्या तिमाहीत नफा वाढला आहे. 

याशिवाय दुसऱ्या तिमाहीत कंपनीचं उत्पन्न २१ टक्क्यांनी वाढून १४६.३ कोटी रुपये झालं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा १२१ कोटी रुपये होता. जून तिमाहीत कंपनीला एकूण ११५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालं होतं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीचा निव्वळ नफा १४६ टक्क्यांनी वाढून सुमारे ३ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा १.२२ कोटी रुपये होता. 

कशी आहे शेअरची वाटचाल?

दोन महिन्यांच्या घसरणीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत या शेअरमध्ये १२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये या शेअरमध्ये १६.५ टक्के आणि ऑगस्टमध्ये जवळपास २ टक्क्यांची घसरण झाली होती. त्या आधीच्या दोन महिन्यात टिमो प्रॉडक्शननं मजबूत परतावा दिला होता. हा शेअर जुलैमध्ये ७.३ टक्के आणि जूनमध्ये ३०.४ टक्क्यांनी वधारला होता. जुलै २०२४ मध्ये नोंदविण्यात आलेल्या १.८७ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीपासून सध्या हा शेअर २१ टक्क्यांनी दूर आहे. नोव्हेंबर २०२३ मधील ५२ आठवड्यांच्या नीचांकी १ रुपयांच्या तुलनेत तो ४८ टक्क्यांनी वर आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner