Penny Stock : या चिमुकल्या शेअरनं १ लाख रुपयांचे केले ४४ लाख; तुमच्याकडं आहे का?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Penny Stock : या चिमुकल्या शेअरनं १ लाख रुपयांचे केले ४४ लाख; तुमच्याकडं आहे का?

Penny Stock : या चिमुकल्या शेअरनं १ लाख रुपयांचे केले ४४ लाख; तुमच्याकडं आहे का?

Published Sep 09, 2024 02:22 PM IST

syncom formulations Share Price : गेल्या साडेचार वर्षांत सिनकॉम फॉर्म्युलेशन्सच्या शेअरमध्ये ४३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स ६१ पैशांवरून २७ रुपयांवर गेले आहेत.

Penny Stock : या चिमुकल्या शेअरनं १ लाखांचे केले तब्बल ४४ लाख; तुमच्याकडं आहे का?
Penny Stock : या चिमुकल्या शेअरनं १ लाखांचे केले तब्बल ४४ लाख; तुमच्याकडं आहे का?

Stock Market Updates : सिनकॉम फॉर्म्युलेशन कंपनीचा चिमुकला शेअरनं अलीकडच्या काळात रॉकेटचा वेग पकडला आहे. आज (९ सप्टेंबर) हा शेअर १७ टक्क्यांनी वधारून २७.२३ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. 

गेल्या साडेचार वर्षांत सिंकॉम फॉर्म्युलेशन्सच्या शेअरमध्ये ४३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. स्मॉलकॅप कंपनी असलेल्या सिनकॉम फॉर्म्युलेशन्सच्या शेअर्सनं या कालावधीत १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे ४४ लाख केले आहेत.

सिनकॉम फॉर्म्युलेशन्सचा शेअर २७ मार्च २०२० रोजी ६१ पैशांवर होता. आज हाच शेअर २७.२३ रुपयांवर पोहोचला आहे. एखाद्या व्यक्तीनं २७ मार्च २०२० रोजी सिनकॉम फॉर्म्युलेशन्सच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक आजपर्यंत कायम ठेवली असती तर त्याच्या एक लाखांच्या शेअर्सची किंमत आज ४४.६३ लाख रुपये झाली असती. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २७.२३ रुपये आहे. हा उच्चांक आज गाठला गेला आहे, तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ७.६६ रुपये आहे.

एका वर्षात २१० टक्क्यांची वाढ

गेल्या वर्षभरात सिनकॉम फॉर्म्युलेशन्सच्या शेअरमध्ये २१० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ११ सप्टेंबर २०२३ रोजी कंपनीचा शेअर ८.७३ रुपयांवर होता. तो शेअर आज ९ सप्टेंबर २०२४ रोजी २७.२३ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये १०५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.  

या स्मॉलकॅप कंपनीचा शेअर ११ मार्च २०२४ रोजी १३.३७ रुपयांवर होता, तो आज २७ रुपयांच्या पुढं गेला आहे. गेल्या महिन्याभरात सिनकॉम फॉर्म्युलेशन्सचे समभाग ७७ टक्क्यांनी वधारले आहेत. ९ ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीचा शेअर १५.४७ रुपयांवर होता, तो अज २७.२३ रुपयांवर पोहोचला आहे.

कंपनीनं दिलाय दणदणीत बोनस

सिनकॉम फॉर्म्युलेशन्सनं ऑगस्ट २०१३ मध्ये गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स भेट दिले होते. कंपनीनं ५:२ या प्रमाणात बोनस शेअर्सचे वाटप केलं होतं. म्हणजेच कंपनीनं गुंतवणूकदारांना प्रत्येक २ शेअरमागे ५ बोनस शेअर्स दिले आहेत.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहेत. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)

Whats_app_banner