Sunshine Capital Ltd Share price : सनशाईन कॅपिटल या चिमुकल्या शेअरमध्ये (Penny Stock) शुक्रवारी मोठी वाढ झाली. सनसाइन कॅपिटलचा शेअर शुक्रवारी ४ टक्क्यांनी वधारून २.५५ रुपयांवर पोहोचला.
गुरुवारी, ८ ऑगस्ट रोजी पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सनसाइन कॅपिटलच्या शेअरमध्ये सुमारे ७ टक्क्यांनी वाढ झाली. नॉन बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) असलेल्या सनशाईन कॅपिटलच्या शेअरमध्ये या वर्षी आतापर्यंत १०५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४.१३ रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ०.४४ रुपये आहे.
सनशाईन कॅपिटलनं नुकतेच आपल्या गुंतवणूकदारांना ७ : १ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत. कंपनीनं प्रत्येक शेअरवर ७ बोनस शेअर्स गिफ्ट केले आहेत. बोनस शेअरची विक्रमी तारीख ७ मार्च २०२४ होती. यासोबतच कंपनीनं आपल्या शेअर्सची विभागणी देखील केली आहे. सनशाईन कॅपिटलनं १० रुपये अंकित मूल्य (Face Value) असलेल्या समभागांची १ रुपयांच्या अंकित मूल्याच्या समभागांमध्ये विभागणी केली आहे.
सनशाईन कॅपिटल कंपनीचा शेअर १६ ऑक्टोबर २०१९ रोजी ०.०७ रुपयांवर (७ पैसे) व्यवहार करत होता. कंपनीचा शेअर ९ ऑगस्ट २०२४ रोजी २.५५ रुपयांवर पोहोचला आहे. सनशाईन कॅपिटलच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात २५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ९ ऑगस्ट २०२३ रोजी कंपनीचा शेअर ०.७२ रुपयांवर होता. तो आज २.५५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या २ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ११०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या काळात कंपनीचा शेअर २० पैशांनी वधारून २.५५ रुपयांवर पोहोचला आहे. सनशाईन कंपनीचं बाजारमूल्य १.३१ हजार कोटी इतकं आहे.