Spright Agro Ltd share price : पेनी स्टॉक स्प्राइट अॅग्रो लिमिटेडनं एका महिन्यात ४२ टक्क्यांची उसळी घेतली आहे. २५ ऑक्टोबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर १४.८४ रुपयांवर होता. तो आज २१.०९ रुपयांवर गेला असून कंपनीनं बोनस शेअर्सची घोषणा केली आहे.
स्प्राइट अॅग्रो १:१ या प्रमाणात बोनस शेअर देणार आहे. अर्थात, कंपनी प्रत्येक एका शेअरमागे १ बोनस शेअर देणार आहे. स्प्राइट अॅग्रो लिमिटेडनं बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट २९ नोव्हेंबर २०२४ ही निश्चित केली आहे.
गेल्या ३ वर्षात स्प्राइट अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये ९ हजार टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांत देखील झपाट्यानं वाढ झाली असून, कंपनीचा शेअर २२ पैशांवरून २१ रुपयांवर गेला आहे. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी स्प्राइट अॅग्रोचा शेअर २२ पैशांवर होता. आज, म्हणजेच २५ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर २१.०९ रुपयांवर बंद झाला. या काळात कंपनीचे समभाग ९४८७ टक्क्यांनी वधारले आहेत.
गेल्या दोन वर्षांत स्प्राइट अॅग्रो लिमिटेडचे समभाग ३८८० टक्क्यांनी वधारले आहेत. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी कंपनीचा शेअर ५३ पैशांवर होता. स्प्राइट अॅग्रो लिमिटेडचा शेअर २५ नोव्हेंबर २०२४ रोजी २१ रुपयांच्या वर बंद झाला. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ८९.३२ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १०.६५ रुपये आहे.
स्प्राइट अॅग्रो वर्षभरात दुसऱ्यांदा बोनस शेअर देत आहे. कंपनी १:१ या प्रमाणात बोनस शेअर्सचे वितरण करत आहे. कंपनीनं यापूर्वी मार्च २०२४ मध्येही गुंतवणूकदारांना १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. त्यावेळी कंपनीनं प्रत्येक १ शेअरमागे १ बोनस शेअर दिला होता. कंपनीनं आपल्या शेअर्सची विभागणी (Split) देखील केली आहे. मार्च २०२४ मध्ये स्प्राइट अॅग्रो लिमिटेडनं प्रत्येक १० रुपयांच्या शेअरचे प्रत्येकी १ रुपयांच्या अंकित मूल्याच्या १० शेअर्समध्ये विभाजन केले.