Penny stock : १२ रुपयांत मिळणारा शेअर घेण्यासाठी उडालीय झुंबड, असं आहे काय त्यात?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Penny stock : १२ रुपयांत मिळणारा शेअर घेण्यासाठी उडालीय झुंबड, असं आहे काय त्यात?

Penny stock : १२ रुपयांत मिळणारा शेअर घेण्यासाठी उडालीय झुंबड, असं आहे काय त्यात?

HT Marathi Desk HT Marathi
Dec 05, 2024 04:30 PM IST

Minolta Finance Share Price : गेल्या तीन वर्षांत ४०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढलेल्या मिनोल्टा फायनान्स या शेअरमध्ये पुन्हा एकदा जोरदार तेजी आली आहे. काय आहे यामागचं कारण?

Minolta Finance share : १२ रुपयांचा मिनोल्टा फायनान्स हा शेअर घेण्यासाठी उडालीय झुंबड
Minolta Finance share : १२ रुपयांचा मिनोल्टा फायनान्स हा शेअर घेण्यासाठी उडालीय झुंबड

Penny Stock Marathi news : मागील काही दिवसांपासून मिनोल्टा फायनान्सच्या शेअरला रोजच्या रोज अप्पर सर्किट लागत आहे. कंपनीच्या शेअरनं गुरुवारी ५ टक्क्यांचा उच्चांक गाठला आणि इंट्राडे उच्चांकी स्तर १२.९३ रुपयांवर पोहोचला. हा या शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांक आहे. शेअरमध्ये सातत्यानं ही वाढ होण्यामागे मोठं कारण आहे.

मिनोल्टा फायनान्स कंपनीच्या संचालक मंडळानं लिक्विडिटी वाढवण्यासाठी आणि निधी उभारणीच्या उद्देशानं स्टॉक स्प्लिट अँड राईट्स इश्यूला मंजुरी दिली आहे. तेव्हापासून हा शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांची रीघ लागली आहे.

एका वर्षात दुपटीनं वाढला शेअर 

डिसेंबर २०२३ मध्ये नोंदवलेल्या ६.२४ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून हा शेअर दुपटीनं वाढला आहे. त्यात १०७ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. डिसेंबरच्या पहिल्या तीन ट्रेडिंग सेशनमध्ये मिनोल्टा फायनान्सचा शेअर २१ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. २०२४ या कॅलेंडर वर्षात या चिमुकल्या शेअरमध्ये ८८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात त्यात ७६ टक्के वाढ झाली आहे. दीर्घ कालावधीत मिनोल्टा फायनान्सनं भरघोस परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षांत मल्टीबॅगर शेअर डिसेंबर २०२१ मधील २.३८ रुपयांवरून ४४३ टक्क्यांनी वाढला आहे.

स्टॉक स्प्लिट आणि राइट्स इश्यू

मिनोल्टा फायनान्स लिमिटेडच्या संचालक मंडळानं स्टॉक स्प्लिटला मान्यता दिली आहे. हा १:१० शेअर स्प्लिट जाहीर करण्यात आला आहे. शेअर विभाजनाव्यतिरिक्त संचालक मंडळानं कंपनीच्या अधिकृत भागभांडवलात लक्षणीय वाढ करण्यास मान्यता दिली आहे. अधिकृत भांडवल १०.२ कोटी रुपयांवरून ६० कोटी रुपये होईल. यात ६ कोटी इक्विटी शेअर्सचा समावेश असेल. या बदलासाठी पोस्टल वॉलेटद्वारे शेअरहोल्डर्सच्या मंजुरीच्या अधीन राहून कंपनीच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशनच्या कलम पाचमध्ये दुरुस्ती करणं आवश्यक आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner