इतकं प्रॉफिट आणि असा शेअर कधीच पाहिला नव्हता! एका दिवसात तब्बल १४,००० रुपयांनी वाढला!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  इतकं प्रॉफिट आणि असा शेअर कधीच पाहिला नव्हता! एका दिवसात तब्बल १४,००० रुपयांनी वाढला!

इतकं प्रॉफिट आणि असा शेअर कधीच पाहिला नव्हता! एका दिवसात तब्बल १४,००० रुपयांनी वाढला!

HT Marathi Desk HT Marathi
Nov 05, 2024 01:11 PM IST

elcid investments share price : एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सच्या शेअरनं आज शेअर बाजारात आणखी एक इतिहास रचला. कंपनीचा शेअर आज तब्बल १४ हजार रुपयांनी वाढला.

इतकं प्रॉफिट आणि असा शेअर कधीच पाहिला नव्हता! एका दिवसात १४ हजार रुपयांनी वाढला!
इतकं प्रॉफिट आणि असा शेअर कधीच पाहिला नव्हता! एका दिवसात १४ हजार रुपयांनी वाढला!

elcid investment share price : एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सच्या शेअरची सध्या शेअर बाजारात जोरदार चर्चा आहे. कंपनीच्या शेअरला सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. या शेअरनं आज पुन्हा एकदा इतिहास रचला. अल्सिड इन्व्हेस्टमेंटच्या शेअरमध्ये मंगळवारी ५ टक्क्यांची म्हणजेच १४,००० रुपयांची वाढ झाली. 

आज हा शेअर २८७१६३.२५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. याआधी सोमवारी कंपनीचा शेअर ५ टक्के अप्पर सर्किटसह २,७३,४८८.८५ रुपयांवर बंद झाला होता. एमआरएफ लिमिटेडला मागे टाकत हा शेअर देशातील सर्वात महागडा शेअर ठरला आहे. एमआरएफ लिमिटेडचा शेअर आज २ टक्क्यांनी घसरून १,१८,६६० रुपयांवर व्यवहार करत आहे.

मागच्या आठवड्यात अचानक प्रकाशझोतात आली कंपनी

गेल्या आठवड्यात २९ ऑक्टोबर रोजी बीएसईकडून होल्डिंग कंपन्यांच्या किमतीसंदर्भात विशेष कॉल लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावात गुंतवणूकदार कोणत्याही प्राइस बँडशिवाय खरेदी-विक्री ऑर्डर देऊ शकतात. या लिलाव सत्रात अल्सिड स्टॉकची किंमत सव्वा दोन लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. अल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे समभाग मंगळवारी, २९ ऑक्टोबर रोजी बीएसईवर (Mumbai Stock Exchange) पुन्हा सूचीबद्ध झाले. शेअरची लिस्टिंग किंमत २.२५ लाख रुपये होती, पण ट्रेडिंग दरम्यान ती ५ टक्क्यांनी वाढून २,३६,२५० रुपये झाली. यावर्षी जुलैमध्ये हा शेअर केवळ ३.२१ रुपयांचा होता. तेव्हापासून त्याच्या शेअर्सचे व्यवहार बंद होते.

बीएसईच्या २१ ऑक्टोबरच्या परिपत्रकानुसार, निवडक इन्व्हेस्टमेंट होल्डिंग कंपन्यांना पुन्हा लिस्ट करण्यात आले आहे. एल्सिड इन्व्हेस्टमेंट ही त्यापैकीच एक कंपनी होती. यापूर्वी अल्सिड इन्व्हेस्टमेंटच्या प्रवर्तकांनी स्वेच्छेनं १,६१,०२३ रुपये प्रति शेअर बेस प्राइसवर शेअर्स डीलिस्ट करण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी विशेष प्रस्ताव मांडण्यात आला होता. नलवा सन्स इन्व्हेस्टमेंट्स, टीव्हीएस होल्डिंग्स, कल्याणी इन्व्हेस्टमेंट कंपनी, एसआयएल इन्व्हेस्टमेंट्स, महाराष्ट्र स्कूटर्स, जीएफएल, हरयाणा कॅफिन आणि पिलानी इन्व्हेस्टमेंट अँड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन या कंपन्यांचे शेअरही डीलिस्ट करण्यात आले होते.

काय करते ही कंपनी?

अल्सिड इन्व्हेस्टमेंट्स ही गुंतवणूक कंपनी श्रेणीअंतर्गत आरबीआयकडे नोंदणीकृत एनबीएफसी आहे. सध्या कंपनीचा स्वत:चा कोणताही ऑपरेटिंग बिझनेस नसला तरी एशियन पेंट्स सारख्या इतर बड्या कंपन्यांमध्ये कंपनीची बरीच गुंतवणूक आहे. एशियन पेंट्स लिमिटेडमध्ये एल्सिड इन्व्हेस्टमेंटचे २,८३,१३,८६० इक्विटी शेअर्स किंवा २.९५ टक्के हिस्सा आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner