Penny Stock : अवघ्या २ रुपयांच्या शेअरमध्ये ३५० टक्क्यांची वाढ, गुंतवणूकदारांनी किती कमावले बघाच!-penny stock gtl infrastructure limited share surges 300 percent lic have 42 crore shares ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Penny Stock : अवघ्या २ रुपयांच्या शेअरमध्ये ३५० टक्क्यांची वाढ, गुंतवणूकदारांनी किती कमावले बघाच!

Penny Stock : अवघ्या २ रुपयांच्या शेअरमध्ये ३५० टक्क्यांची वाढ, गुंतवणूकदारांनी किती कमावले बघाच!

Aug 01, 2024 04:53 PM IST

Penny Stock news : एलआयसीची मजबूत गुंतवणूक असलेल्या जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीनं मागच्या वर्षभरात गुंतवणूकदारांना दुपटीहून अधिक नफा मिळवून दिला आहे.

पेनी स्टाॅक
पेनी स्टाॅक

Penny Stock : एखादा चिमुकला शेअर काय चमत्कार करू शकतो याची प्रचिती जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअरनं दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदारांमध्ये या शेअरची चर्चा आहे. हा पेनी स्टॉक सातत्यानं उत्तम परतावा देत आहे. मागच्या पाच वर्षांत या शेअरमध्ये ३५० टक्क्यांची वाढ झाली आहे.

भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (LIC) जीटीएल इन्फ्राचे ३.३३ टक्के म्हणजेच ४२,६१,७७,०५८ शेअर्स आहेत. केवळ एलआयसीच नव्हे तर अनेक बड्या सरकारी आणि खासगी बँकांनीही या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे.

यंदाच्या कॅलेंडर वर्षात, म्हणजेच जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत जीटीएलनं गुंतवणूकदारांना १०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या कालावधीत शेअरची किंमत एनएसईवर सुमारे १.४० रुपयांनी वाढली आहे.

सध्याच्या बाजारभावानुसार, या पेनी शेअरनं ६ जूनपासून जवळपास १०० टक्के परतावा दिला आहे. ६ जून रोजी बीएसईवर हा शेअर १.४९ रुपयांवर व्यवहार करत होता. त्यानंतर मधल्या काही दिवसांचा अपवाद वगळता हा शेअर सातत्यानं तेजीत आहे.

बीएसई अ‍ॅनालिटिक्सनुसार, गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये ४४ टक्के आणि या वर्षी आतापर्यंत १०३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर, मागच्या एका वर्षात २६६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मागच्या पाच वर्षांत या शेअरनं सुमारे ३२४ टक्के परतावा दिला आहे. कंपनीचं बाजार भांडवल ३५३४.८१ रुपये आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी भाव ४.३५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी भाव ०.७० रुपये आहे.

काय करते ही कंपनी?

वायरलेस टेलिकॉम ऑपरेटर्सद्वारे सामायिक केलेले टेलिकॉम टॉवर्स आणि कम्युनिकेशन यंत्रणा उभारण्याचं आणि त्यांचं व्यवस्थापन करण्याचं काम जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी करते. भारतातील सर्व २२ टेलिकॉम सर्कलमध्ये कंपनीचा सुमारे २६,००० टॉवर्सचा पसारा आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)

Whats_app_banner