Penny Stocks News in Marathi : पेनी स्टॉक्स अर्थात अगदी कमी किंमतीत मिळणाऱ्या शेअरच्या बाबतीत एक भीती नेहमी व्यक्त केली जाते, ती म्हणजे त्यात खूप जोखीम असते. यात चुकीचं काही नसलं तरी त्यात परताव्याची शक्यताही तितकीच असते. प्रवेग लिमिटेड हा पेनी स्टॉक असाच ठरल आहे. या शेअरनं गुंतवणूकदारांना करोडपती बनवलं आहे.
एकेकाळी या शेअरची किंमत फक्त ४.३४ रुपये होती. गेल्या वर्षभरात त्यात तब्बल १५,७०० टक्के वाढ झाली आहे. आजच्या घडीला प्रवेगच्या शेअर्सची किंमत ७३० रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळं पाच वर्षांपूर्वी १ लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा परतावा १.६८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
गेल्या महिनाभरात प्रवेग कंपनीच्या शेअरच्या किमतीत शून्य टक्क्यांची वाढ झाली आहे. तर ज्या गुंतवणूकदारांनी ६ महिने कंपनीचे शेअर्स ठेवले आहेत, त्यांना १६ टक्के फायदा झाला आहे. मात्र, २०२४ मध्ये कंपनीच्या शेअरच्या किमती तब्बल ८ टक्क्यांनी घसरल्या आहेत. गेल्या वर्षभरात या शेअरनं केवळ ६ टक्के परतावा दिला आहे.
तीन वर्षांपूर्वी प्रवेगच्या शेअरच्या किमतीत सव्वापाच पटीनं वाढ झाली होती. त्यावेळी कंपनीच्या शेअर्सची किंमत १३९ रुपये होती. तर, ५ वर्षांत या स्मॉलकॅप शेअरनं १५,७०० टक्के परतावा दिला आहे. कंपनी सातत्यानं गुंतवणूकदारांना लाभांश देत आहे. २०२१ पासून कंपनीनं दरवर्षी गुंतवणूकदारांना लाभांश दिला आहे. २०२० मध्ये कंपनीनं प्रति शेअर १ रुपये लाभांश दिला होता. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १३० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ६३७.१० रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १८७७.६५ कोटी रुपये आहे.
संबंधित बातम्या