३१ पैशाच्या शेअरनं केलं मालामाल; १ लाखाचे झाले २३ लाख! आताचा भाव माहीत आहे का?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ३१ पैशाच्या शेअरनं केलं मालामाल; १ लाखाचे झाले २३ लाख! आताचा भाव माहीत आहे का?

३१ पैशाच्या शेअरनं केलं मालामाल; १ लाखाचे झाले २३ लाख! आताचा भाव माहीत आहे का?

Updated Aug 07, 2024 01:38 PM IST

Penny Stocks News : बिट्स लिमिटेडच्या चिमुकल्या शेअरनं अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना सातपटीहून अधिक परतावा दिला आहे.

Penny Stocks : ३१ पैशाच्या शेअरनं अक्षरश: मालामाल केलं! आताचा भाव माहीत आहे का?
Penny Stocks : ३१ पैशाच्या शेअरनं अक्षरश: मालामाल केलं! आताचा भाव माहीत आहे का?

Penny Stock news : अवघं ७७ कोटींचं बाजारमूल्य असलेल्या बिट्स लिमिटेड या चिमुकल्या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात वादळी वाढ झाली आहे. या शेअरनं गुंतवणूकदारांना अक्षरश: मालामाल करून टाकलं आहे. मागच्या वर्षभरात बिट्स लिमिटेडचा शेअर ३१ पैशांवरून ७ रुपयांवर गेला आहे.

बिट्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये वर्षभरात २१०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आज ७ ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीचा शेअर ७.०५ रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या समभागांनी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. 

वर्षभरात ३१ पैशांचा टप्पा ओलांडून ७ रुपयांवर गेलेल्या बिट्स लिमिटेडच्या 
शेअरमध्ये गेल्या वर्षभरात २१७५ टक्के वाढ झाली आहे. बिट्स लिमिटेडचा शेअर २३ ऑगस्ट २०२३ रोजी ३१ पैशांवर होता. हाच शेअर आज, ७ ऑगस्ट २०२४ रोजी ७.०५ रुपयांवर पोहोचला आहे. 

एका वर्षात १ लाखाचे २३ लाख 

एखाद्या व्यक्तीनं २३ ऑगस्ट २०२३ रोजी बिट्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर सध्या त्यानं खरेदी केलेल्या शेअर्सची किंमत २२.७३ लाख रुपये इतकी झाली असती. बिट्स लिमिटेडच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३० पैसे आहे.

जानेवारीपासून आतापर्यंत ३०५ टक्के वाढ

चालू कॅलेंडर वर्षात या शेअरमध्ये आतापर्यंत ३०५ टक्के वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२४ रोजी बिट्स लिमिटेडचा शेअर १.७४ रुपयांवर होता. कंपनीचा शेअर ७ ऑगस्ट २०२४ रोजी ७.०५ रुपयांवर पोहोचला आहे. तर, गेल्या ६ महिन्यांत या छोट्या कंपनीच्या शेअर्समध्ये १५८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स २.७३ रुपयांवरून ७ रुपयांपर्यंत वाढले आहेत. गेल्या महिन्याभरात बिट्स लिमिटेडच्या शेअरमध्ये ७७ टक्के वाढ झाली आहे. ८ जुलै २०२४ रोजी बिट्सचा शेअर ३.९९ रुपयांवर होता. तो आता ७.०५ रुपयांवर पोहोचला आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)

Whats_app_banner