मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Paytm UPI Lite : यूपीआय पेमेंट करा तेही पिन न टाकता, ही प्रोसेस फाॅलो करा

Paytm UPI Lite : यूपीआय पेमेंट करा तेही पिन न टाकता, ही प्रोसेस फाॅलो करा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 19, 2023 04:05 PM IST

Paytm UPI Lite : पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने लहान मूल्याच्या यूपीआय व्यवहारांसाठी यूपीआय लाईट हे वैशिष्ट्य सुरू केले आहे. याच्या मदतीने तुम्ही यूपीआय पिन न टाकताही पेमेंट करू शकता.

Paytm HT
Paytm HT

Paytm UPI Lite : युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआय हा अलिकडच्या वर्षांत सर्वाधिक वापरले जाणारा डिजिटल पेमेंट मोड म्हणून उदयास आले आहे. छोट्या रकमेचे यूपीआय ​​पेमेंट सुलभ करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर २०२२ मध्ये यूपीआय लाईट हे वैशिष्ट्य सादर केले होते. आता पेटीएमनेही हे फीचर आपल्या यूजर्ससाठी आणले आहे. या फीचरची खास गोष्ट म्हणजे २०० रुपयांपर्यंतच्या यूपीआय पेमेंटसाठी तुम्हाला ४ किंवा ६ अंकी यूपीआय पिन टाकावा लागणार नाही.

पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड ने लहान मूल्याच्या यूपीआय व्यवहारांसाठी यूपीआय लाईट वैशिष्ट्य सुरू केले आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, या फीचरद्वारे यूजर्स एका क्लिकवर जलद रिअल-टाइम व्यवहार करू शकतील. पेटीएम पेमेंट्स ही यूपीआय लाईट फीचर लाँच करणारी पहिली पेमेंट बँक आहे.

पासबूकमध्ये एन्ट्री नाही

या फीचरची खास गोष्ट म्हणजे आता दररोज होणाऱ्या छोट्या व्यवहारांमुळे बँकेचे पासबुक भरले जाणार नाही. हे व्यवहार आता फक्त पेटीएम बॅलन्स आणि हिस्ट्री विभागातच दिसतील.

२०० रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी पिन टाकावा लागणार नाही

पेटीएम पेमेंट्स बँकेनुसार, एकदा लोड केल्यानंतर यूपीआय लाइट वॉलेट वापरकर्ते पिन न टाकता २०० रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकतात. यामुळे पेमेंट प्रक्रिया सुलभ आणि जलद होईल. यूपीआय लाईटमध्ये दिवसातून २ वेळा जास्तीत जास्त २००० रुपये डिपाॅझीट केले जाऊ शकतात. या फीचरचा वापर करून तुम्ही एका दिवसात कमाल ४००० रुपयांचे पेमेंट करू शकतात. सध्या हे वैशिष्ट्य सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही.

पेटीएममध्ये यूपीआय लाइट कसे सक्रिय करावे

>> सर्वप्रथम पेटीएम अॅप अपडेट करा.

>> आता पेटीएम अॅप उघडा

>> यानंतर पेटीएम होम पेजच्या वरच्या डाव्या बाजूला प्रोफाईलवर टॅप करा.

>> आता यूपीआय आणि पेमेंट सेटिंग्जवर क्लिक करा आणि इतर सेटिंग्जमध्ये यूपीआय लाईटवर टॅप करा

>> त्यानंतर यूपीआय लाईटसाठी पात्र बँक खाते निवडा

>> यूपीआय लाईट सक्रिय करण्यासाठी पैसे जोडा

>>पृष्ठावर यूपीआय लाईटमध्ये जोडायची रक्कम प्रविष्ट करा.

>> यूपीआय पिन टाकून त्याची पडताळणी करा. अशा प्रकारे यूपीआय लाईट खाते तयार होईल.

>> यूपीआय लाईट खाते तयार झाल्यानंतर, तुम्ही तुमचा पिन न टाकता पुढील यूपीआय पेमेंट करू शकता.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग