मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Paytm Stocks : अरे देवा ! पेटीएम स्टाॅक तब्बल ७८ टक्क्यांनी गडगडला, पैशांचा चुराडा

Paytm Stocks : अरे देवा ! पेटीएम स्टाॅक तब्बल ७८ टक्क्यांनी गडगडला, पैशांचा चुराडा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 23, 2022 02:53 PM IST

गेल्या दोन आठवड्यांपासून पेटीएमच्या शेअर्स किंमतींमध्ये २६ टक्के घसरण झाली आहे, कंपनीचा आयपीओ दाखल झाल्यापासून त्यांच्या किंमतींच्या तुलनेत ७८ टक्के घसरला आहे. पेटीएमची इश्यू किंमत अंदाजे २१५० रुपये होती.

paytm HT
paytm HT

Paytm Stocks : गेल्या दोन आठवड्यांपासून पेटीएमच्या शेअर्स किंमतींमध्ये २६ टक्के घसरण झाली आहे, कंपनीचा आयपीओ दाखल झाल्यापासून त्यांच्या किंमतींच्या तुलनेत ७८ टक्के घसरला आहे. पेटीएमची इश्यू किंमत अंदाजे २१५० रुपये होती.

कुठल्याही आयपीओचा इतका गाजावाजा नसेल तितका तो पेटीएमचा झाला. पेटीएमची पालक कंपनी वन ९७ कम्युनिकेशन कंपनीने नोव्हेंबर २०२१ मध्ये पेटीएमचा आयपीओ बाजारात आणला. हा आयपीओ येताच तो खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या अक्षरश: उड्या पडल्या. पण आज वर्षभरानंतर तो इश्यू प्राईसपेक्षाही ७८ टक्के खाली गटांगळी खातोय. गेल्या दोन आठवड्यांपासून पेटीएमच्या शेअर्सच्या किंमतींमध्ये २६ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे. पेटीएमची इश्यू प्राईस अंदाजे २१५० रुपये होती. आता तो अंदाजे ४५९.५५ रुपयांवर ट्रेड करत आहे.

५२ आठवड्यातील निचांकी पातळी

कंपनीच्या शेअर्सनी ५२ आठवड्यांची निचांकी पातळी गाठली आहे. आज सकाळी शेअर्स ५३५ रुपयांच्या पातळीवर खुला झाला. पण गुंतवणूकदारांनी विक्रीचा जोर कायम ठेवल्याने शेअर्स एनएसईवर ४८३.२० रुपयांवर आले. दुपारपर्यंत पेटीएमच्या शेअर्सनी ५२ आठवड्यांतील निचांकी पातळी गाठली.

सर्वात मोठा आयपीओ

नोव्हेंबर २०२१ मध्ये दाखल झालेला पेटीएम आयपीओ हा आतापर्यंतचा सर्वात मोठा १८,३०० कोटी रुपयांचा होता.  त्यानंतर कोल इंडिया सुमारे १५,५०० कोटी रुपये आणि रिलायन्स पॉवर ११,७०० कोटी रुपये होता. दरम्यान, कंपनीची ध्येय धोरणे खंबीर असून, चांगल्या वेगाने कंपनी कम बॅक करेल असे  वन ९७  इंडिया कंपनीतर्फे सांगण्यात आले. 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग