Paytm Shares : पेटीएमच्या शेअर्समध्ये पुन्हा जबरदस्त तेजी, तज्ज्ञ म्हणतात…
Paytm Shares rise : बीएसईवर बुधवारी प्रती शेअर्सवर २ टक्के तेजीसह पेटीएमचा शेअर्स ६३५.८५ रुपयांवर पोहोचला होता. बाजार भांडवल अंदाजे ४० हजार कोटी रुपये आहे.
Paytm Shares : आठवड्याच्या तिसऱ्या सत्रात बुधवारी शेअर बाजारात तेजी पहायला मिळाली. तर पेटीएमची पालक कंपनी वन ९७ कम्युनिकेशनच्या शेअर्समध्येही २ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. या शेअर्सबाबत तज्ज्ञ बुलिश आहेत. ब्रोकरेज फर्म माॅर्गन स्टेनलीने हा शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीचे लिस्टिंग २०२१ मध्ये झाले होते.
ट्रेंडिंग न्यूज
टार्गेट प्राईस
माॅर्गन स्टेनलेने या शेअर्ससाठी ६९५ रुपयांचे टार्गेट प्राईस ठेवले आहे. याचप्रमाणे सिटीने १०६१ रुपयांच्या टार्गेट प्राईसह बाय नाऊ चे रेटिंग दिले आहे. बीएसईवर बुधवारी हा शेअर्स २ टक्के तेजीसह ६३५.८५ रुपयांवर पोहोचले आहे. बाजार भांडवल ४० हजार कोटींच्या घरात गेले आहे.
ब्रोकरेजचे म्हणणे काय
माॅर्गन स्टेनलेने म्हटले आहे की, वन ९७ कम्युनिकेशनला यूपीआयशी संबंधित निर्णयामुळे फायदा होईल. कारण पेटीएम बँकेला भरावी लागणारी इंटरचेंज फी कमी झाली आहे. त्याचाही फायदा कंपनीला होईल.
कंपनीचा परफाॅर्मन्स
गेल्या वर्षी गुंतवणूकदारांना या शेअर्सने अक्षरश : रडवलं होतं. एका वर्षात या शेअरच्या किंमतीत ४२.५८ टक्के घट झाली होती.मात्र फेब्रुवारीच्या तिमाही निकालामध्ये कंपनीला नफा झाला होता. त्यामुळे या शेअर्सनी बाऊन्स बॅक केले होते. पेटीएमच्या महसुली उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं कंपनीचा तोटा कमी झाला आहे. त्याचा परिणाम शेअरच्या किंमतींवर दिसून आला.
दरम्यान, डिसेंबर अखेरच्या तिमाहीत पेटीएमचा निव्वळ तोटा ३९२ कोटींपर्यंत खाली आला आहे. वर्षभरापूर्वी तोट्याचा हाच आकडा ७७९ कोटी रुपये होता. त्याच वेळी, पेटीएमचा ऑपरेशन्समधील महसूल ४२ टक्क्यांनी वाढून २०६२ कोटी झाला. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी महसुलात वाढ, कर्ज वितरणातील वाढ यामुळे ही वाढ नोंदवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या