मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Paytm: पेटीएम ग्राहकांना मोठा दिलासा, आरबीआयने बंदी लागू करण्याची मुदत वाढवली

Paytm: पेटीएम ग्राहकांना मोठा दिलासा, आरबीआयने बंदी लागू करण्याची मुदत वाढवली

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 16, 2024 08:40 PM IST

RBI: आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी लागू करण्याची मुदत १५ मार्चपर्यंत वाढवली आहे.

Paytm
Paytm (REUTERS)

Paytm Payment Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँके बंदी लागू करण्याची मुदत वाढवली आहे. दरम्यान, २९ फेब्रुवारी २०२४ रोजी पेटीएम बँकेवर बंदी लागू करण्यात येणार होती. मात्र, या तारीखेत बदल करत आयबीआयने येत्या १५ मार्चपर्यंत मुदत वाढवली आहे. म्हणजेच पेटीएमच्या ग्राहकांना १५ दिवसांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. आयबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला भागीदार बँकांकडे ग्राहकांच्या ठेवी काढण्याची सुविधा देण्यास सांगितले आहे. मध्यवर्ती बँकेने नियमांचे पालन न केल्यामुळे पेमेंट्स बँकेवर कारवाई करण्यात आली.

ज्यांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल, त्यांचे हित आणि व्यापक जनहित लक्षात घेऊन हा मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने बंदी घातल्यानंतर पेटीएमच्या ग्राहकांना अनेक प्रश्न पडले आहेत. ग्राहकांचा गोंधळ दूर करण्यासाठी आरबीआयने एफएक्यू म्हणजेच वारंवार विचारले जाणारे प्रश्नांची यादी आणि त्याचे उत्तर जारी केले.

इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (IHMCL), भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची टोल वसुली शाखाने हायवे वापरकर्त्यांना त्रास टाळण्यासाठी पेटीएम पेमेंट्स बँक व्यतिरिक्त ३२ अधिकृत बँकांकडून 'फास्टॅग' सेवा घेण्याचा सल्ला दिला आहे. यात एअरटेल पेमेंट्स बँक, अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँक यांचा समावेश आहे. एनएचएआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतात ८ कोटींहून अधिक 'फास्टॅग' वापरकर्ते आहेत आणि पेटीएम पेमेंट्स बँकेचा बाजारात ३० टक्के वाटा आहे.

१५ मार्टनंतर पेटीएम क्यूआर कोड, पेटीएम साउंडबॉक्स बंद होईल का?

विजय शेखर शर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर आरबीआयचे प्रश्न शेअर केले आणि सांगितले की पेटीएम क्यूआर, साउंडबॉक्स आणि ईडीसी (कार्ड मशीन) १५ मार्चनंतरही नेहमीप्रमाणे काम करत राहतील. पेटीएम पेमेंट्स बँकेत ५१ टक्के हिस्सा असलेले शेखर म्हणाले की, 'कोणत्याही अफवांना बळी पडू नका किंवा डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू देऊ नका.

UPI News : फोन पे, गुगल पेचं वर्चस्व मोडून काढण्याच्या केंद्राच्या हालचाली, ऑनलाइन पेमेंटचं काय होणार?

१५ मार्चनंतर खात्यातून पैसे काढता येतील का?

- खातेदारांना १५ मार्टनंतरही त्यांच्या खात्यातून पैसे काढता येऊ शकतात. पैसे काढण्यासाठी ग्राहक एटीएम कार्डचाही वापर करु शकतात. पैसे काढताना ग्राहकांना कोणतीही अचडण येणार नाही.

१५ मार्चनंतर खात्यात पैसे जमा करता येतील का?

- खातेदारांना १५ मार्टनंतर खात्यात पैसे जमा करता येणार नाहीत.

 

पेटीएम पेमेंट्स बँक खात्यात माझा पगार येतो, हे खाते सॅलेरी अकाऊंट म्हणून सुरू ठेवता येईल का?

- नाही, खातेदाऱ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी दुसऱ्या बँकेत सॅलेरी अकाऊंट उघडावे.

 

पेटीएम पेमेंट्स बँक खात्यातून आपोआप लाईट बिल वजा होतो, हे सुरु राहिल का?

- नाही, १५ मार्चपूर्वी ग्राहकांनी पर्यायी व्यवस्था करावी.

WhatsApp channel