RBI FAQs on Paytm Payment Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेवर लादण्यात आलेल्या निर्बंधांनंतर ग्राहकांमध्ये प्रचंड संभ्रमाचं वातावरण आहे. ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. ग्राहकांचा हा गोंधळ दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची व त्याच्या उत्तरांची यादाची जाहीर केली आहे. त्याद्वारे ग्राहकांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी स्वत: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर रिझर्व्ह बँकेचे FAQ शेअर केले आहेत. यासोबतच त्यांनी लोकांना कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचा सल्ला दिला आहे.
जाणून घेऊया पेटीएम पेमेंट्स बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न आणि आरबीआयनं त्यास दिलेली उत्तरं.
उत्तर: होय. तुम्ही तुमच्या खात्यातील उपलब्ध शिल्लक देखील काढू शकता आणि ट्रान्सफरही करू शकता. याशिवाय, खात्यातील उर्वरित रक्कम काढण्यासाठी किंवा हस्तांतरित करण्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड वापरू शकता.
उत्तर: नाही, १५ मार्च २०२४ नंतर तुम्ही तुमच्या पेटीएम पेमेंट बँक खात्यात पैसे जमा करू शकणार नाही. या तारखेनंतर व्याज, कॅशबॅक, स्वीप-इन किंवा भागीदार बँकांकडून परतावा याव्यतिरिक्त कोणतेही क्रेडिट किंवा ठेव करण्याची परवानगी नाही.
उत्तर: होय हे शक्य आहे. १५ मार्चनंतरही तुमच्या खात्यात परतावा, कॅशबॅक, स्वीप-इन किंवा भागीदार बँकांकडून व्याज जमा करण्याची परवानगी आहे.
उत्तर: भागीदार बँकांमध्ये ठेवलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांच्या सध्याच्या ठेवी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या खात्यांमध्ये परत केल्या जाऊ शकतात. त्याची मर्यादा एका दिवसात २ लाख रुपये आहे. तथापि, १५ मार्च २०२४ नंतर पेटीएम पेमेंट्स बँकेद्वारे भागीदार बँकांमध्ये कोणत्याही नवीन ठेवींना परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे नवीन ठेवींवर बंदी असेल.
उत्तर: १५ मार्च २०२४ नंतर पेटीएम पेमेंट्स बँकेच्या तुमच्या खात्यात अशा प्रकारचे कोणतेही पैसे क्रेडिट होणार नाहीत. गैरसोय टाळण्यासाठी तुम्ही १५ मार्च २०२४ च्या आधी इतर कोणत्याही बँकेत पर्यायी व्यवस्था करावी.
उत्तर: १५ मार्च २०२४ नंतर हे कुठलेही लाभ पेटीएम पेमेंट बँकेच्या खात्यात येणार नाहीत. कोणतीही गैरसोय किंवा व्यत्यय टाळण्यासाठी या तारखेच्या आधी तुमचं लिंक केलेले खाते दुसऱ्या बँकेत स्विच करण्याची व्यवस्था करा.
उत्तर: १५ मार्च २०२४ नंतर तुमच्या खात्यांमध्ये क्रेडिट किंवा क्रेडिटला परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळं गैरसोय टाळण्यासाठी तुम्ही इतर कोणत्याही बँकेमार्फत पर्यायी व्यवस्था करावी.
उत्तर: ऑटो ट्रान्सफर किंवा विथड्रॉवल हे तुमच्या खात्यात शिल्लक उपलब्ध होईपर्यंत सुरू राहतील. मात्र १५ मार्च २०२४ नंतर तुमच्या खात्यांमध्ये क्रेडिटची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळं गैरसोय टाळण्यासाठी इतर कोणत्याही बँकेमार्फत पर्यायी व्यवस्था करावी.
उत्तर: १५ मार्च २०२४ च्या आधी इतर कोणत्याही बँकेद्वारे EMI पेमेंट करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करा. तुमचे कर्ज इतर कोणत्याही बँकेशी जोडलेले असेल तर ईएमआय पेमेंटची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.
रिझर्व्ह बँकेच्या वॉलेटमध्ये पैसे शिल्लक असेपर्यंत वॉलेट वापरता येईल. १५ मार्च नंतर तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये कॅशबॅक किंवा रिफंड देखील मिळवू शकता. तथापि, या तारखेनंतर तुम्ही टॉप-अप किंवा मनी ट्रान्सफर सारख्या सुविधांचा लाभ घेऊ शकणार नाही. तुम्ही तुमचे वॉलेट बंद करू शकता आणि तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता.
FASTag साठी पेटीएम पेमेंट्स बँकेचा वापर शिल्लक रक्कम वापरण्यापुरता केला जाऊ शकतो. १५ मार्च २०२४ नंतर पेटीएम पेमेंट्स बँकेन जारी केलेल्या FASTags वर पुढील निधी किंवा टॉप-अपला परवानगी दिली जाणार नाही. कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी १५ मार्च २०२४ च्या आधी दुसऱ्या बँकेनं जारी केलेला नवीन FASTag खरेदी करावा. १५ मार्चनंतर FASTag टॉप-अप किंवा रिचार्ज करता येणार नाही. FASTag मध्ये क्रेडिट बॅलन्स ट्रान्सफर सुविधा उपलब्ध नाही.
संबंधित बातम्या