मराठी बातम्या  /  business  /  UPI : नव्या वर्षातला नवा फतवा, UPI ट्रॅन्झॅक्शनवर द्यावा लागेल चार्ज, जाणून घ्या भूर्दंड कोणाला ?
UPI HT
UPI HT

UPI : नव्या वर्षातला नवा फतवा, UPI ट्रॅन्झॅक्शनवर द्यावा लागेल चार्ज, जाणून घ्या भूर्दंड कोणाला ?

29 March 2023, 17:49 ISTKulkarni Rutuja Sudeep

UPI : नॅशनल पेमेंट काॅर्पोरेशन आॅफ इंडियाने यासंदर्भात ट्विट केले आहे. युपीआयवर चार्जेस लागू करणार असल्याचे म्हटले होते. मात्र हे चार्जेस कोणाला लागू करण्यात आले आहेत, ते जाणून घ्या

UPI : देशात यूपीआयद्वारे व्यवहार करणाऱ्यांचे प्रमाण लाखोंच्या घरात आहेत. दर दिवशी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार यूपीआयद्वारे केले जातात. त्यामुळे यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या निर्णयामुळे आम आदमींमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. कारण एनपीसीआयने यासंदर्भात स्पष्टीकरण जाहीर केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यासंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, २००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर १.१ टक्के शुल्क आकारले जाईल असे म्हटले आहे. पण या बदलांचा सर्वसामान्य ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. हे शुल्क यूपीआयद्वारे व्यापारी व्यवहार (Merchant Transaction) प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सवर (पीपीआय) शुल्क लागू होणार आहे.

भार व्यापारी यूपीआय शुल्कावरच

व्यापारी यूपीआय व्यवहारांवर हे शुल्क आकारले जाणार आहे.. म्हणजेच, बँका आणि प्रीपेड वॉलेटमधील पीअर टू पीअर (पीटूपी) आणि पीअर टू मर्चंट (पीटूएम) व्यवहारांवर हे शुल्क लागू होणार नाही. म्हणजे ग्राहकांना याचा भार पडणार नाही. आम आदमीसाठी यूपीआय पेमेंट पूर्णपणे मोफत आहे.

ग्राहकांना यूपीआय मोफतच

ग्राहकांच्या बँक खात्याशी जो़डलेल्या यूपीआयच्या (UPI) कोणत्याही व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ते पूर्वीप्रमाणे विनामुल्य असेल. त्यामुळे ग्राहक विनादिक्कत व्यवहार करु शकतात. एखाद्या व्यक्तीला किंवा दुकानदाराला पैसे देण्यासाठी पेमेंट पर्याय म्हणून बँक खाते निवडले, तर तुम्हाला शुल्क द्यावे लागणार नाही. म्हणजेच, कोणत्याही प्रकारचे शुल्क टाळण्यासाठी यूपीआय पेमेंट करताना बँक खात्याचा पर्याय निवडणे चांगले राहिल असे सध्याच्या नियमांवरून दिसत आहे.

विभाग