Stock Market News Update : आयपीओ आल्यापासून उत्तरोत्तर गाळात गेलेल्या पेटीएमच्या शेअरनं जोरदार कमबॅक केलं असून मागच्या अवघ्या दोन महिन्यांत हा शेअर २१० टक्क्यांनी वाढला आहे. या तेजीमुळं शेअरच्या किंमतीनं १ हजाराचा टप्पाही ओलांडला आहे.
पेटीएमचा शेअर सोमवारी एनएसईवर २.४७ टक्क्यांनी वाढून १००८ रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअर्सनीही सोमवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. हा शेअर काही महिन्यांच्या ३१० रुपयांच्या नीचांकी पातळीवरून तिपटीनं वधारला आहे. गेल्या १० महिन्यांत शेअरमध्ये २१० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सचा शेअर ९ मे २०२४ रोजी ३१० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. १६ डिसेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर १०१२.८५ रुपयांवर पोहोचला. पेटीएमच्या शेअरमध्ये आतापर्यंतच्या नीचांकी पातळीपासून तीन पटीनं वाढ झाली आहे. हा शेअर ३१० रुपयांच्या पातळीवरून २२० टक्क्यांपेक्षा जास्त वधारला आहे. मात्र, कंपनीचे शेअर्स अजूनही २१५० रुपयांच्या म्हणजेच आयपीओ किंमतीपेक्षा बरेच खाली आहेत.
पेटीएमच्या शेअर्समध्ये गेल्या १० महिन्यांत प्रचंड वाढ झाली आहे. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी कंपनीचा शेअर ३२५.२५ रुपयांवर होता. आज तो १००८ रुपयांवर पोहोचला. गेल्या ६ महिन्यांत पेटीएमच्या शेअरमध्ये १४३ टक्क्यांची वाढ झाली आहे. १८ जून २०२४ रोजी कंपनीचा शेअर ४१७.१० रुपयांवर होता, तो आज १००८ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन महिन्यांत कंपनीचे शेअर्स जवळपास ५० टक्क्यांनी वधारले आहेत. तर पेटीएमच्या मूळ कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या महिन्याभरात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत २१५० रुपये होती. कंपनीचा आयपीओ ८ नोव्हेंबर २०२१ रोजी बोलीसाठी खुला होता आणि १० नोव्हेंबरपर्यंत खुला होता. १८ नोव्हेंबर २०२१ रोजी पेटीएमचा शेअर बीएसईवर १९५५ रुपयांवर लिस्ट झाला होता. कंपनीचा आयपीओ एकूण १.८९ पट सब्सक्राइब झाला. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा १.६६ पट सब्सक्राइब करण्यात आला.
संबंधित बातम्या