मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Paytm Train Ticket : पेटीएमवरून बुक केलेलं ट्रेन तिकीट रद्द केल्यास ग्राहकांना १०० टक्के रिफंड

Paytm Train Ticket : पेटीएमवरून बुक केलेलं ट्रेन तिकीट रद्द केल्यास ग्राहकांना १०० टक्के रिफंड

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 23, 2023 05:27 PM IST

Paytm Train Ticket refund : पेटीएमने आपल्या ग्राहकांना ट्रेन तिकीट रद्द केल्यावर १००% परतावा देण्यासाठी कॅन्सल प्रोटेक्ट (Cancel Protect) सेवा सुरू केली आहे.

paytm railway ht
paytm railway ht

Paytm Train Ticket refund : आता रेल्वे प्रवाशांना तिकीट रद्द केल्यावर पूर्ण परतावा मिळेल आणि कोणत्याही प्रकारची कपात केली जाणार नाही. पेटीएमद्वारे बुक केलेल्या तिकिटांवर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

यानुसार, पेटीएमने आपल्या ग्राहकांना ट्रेन तिकीट रद्द केल्यावर १००% परतावा देण्यासाठी कॅन्सल प्रोटेक्ट सेवा सुरू केली आहे. ट्रेन तिकीट बुकिंगसोबत पेटीएम बस तिकीट बुकिंग, मेट्रो टोकन आणि स्मार्ट कार्ड रिचार्जिंग सारख्या सुविधा देखील पुरवते.

रेल्वे तिकीटावर सुविधा सुरु

वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेडच्या मालकीची पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमने सांगितले आहे की, ट्रेन तिकीट रद्द केल्यावर त्यांच्या निवडक वापरकर्त्यांना पूर्ण पैसे परत देण्याची हमी यात मिळेल. पेटीएम सुपर अॅपच्या वापरकर्त्यांना रेल्वे तिकीट बुकिंगवर 'कॅन्सल प्रोटेक्ट' सह मोफत रद्द करण्याची सुविधा दिली जाईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

तिकीट रद्द केल्यावर १००% परतावा

'कॅन्सल प्रोटेक्ट' कव्हरमध्ये यूजर्स नियोजित गाडी सुटण्याच्या वेळेच्या किमान ६ तास आधी पेटीएमद्वारे केलेल्या ट्रेनच्या तिकीट बुकिंगवर १००% इन्स्टंट रिफंडचा दावा करू शकतात. 'कॅन्सल प्रोटेक्ट' सह, प्रवासी कोणतेही प्रश्न न विचारता कुठूनही, कधीही, नियमित आणि तत्काळ ट्रेन तिकीट रद्द करू शकतात.

पेटीएम तिकीट बुकिंगवर पेमेंट चार्ज शून्य टक्के

पेटीएम यूजर्स पेटीएम यूपीआयच्या माध्यमातून बुक करण्यात आलेल्या ट्रेन तिकीटांवर शून्य टक्के शुल्काचा आनंद घेऊ शकतात. यूजर्स तत्काळ तिकिटे बुक करू शकतात, ट्रेनची स्थिती तपासू शकतात, प्लॅटफॉर्म क्रमांक तपासू शकतात आणि पेटीएम किंवा इतर प्लॅटफॉर्मवर बुक केलेल्या सर्व तिकिटांसाठी पीएनआर तपासू शकतात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग