IPO News : परमेश्वर मेटलच्या आयपीओवर जनता जनार्दन फिदा; तब्बल ६०० पटीहून जास्त मिळालं सबस्क्रिप्शन
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO News : परमेश्वर मेटलच्या आयपीओवर जनता जनार्दन फिदा; तब्बल ६०० पटीहून जास्त मिळालं सबस्क्रिप्शन

IPO News : परमेश्वर मेटलच्या आयपीओवर जनता जनार्दन फिदा; तब्बल ६०० पटीहून जास्त मिळालं सबस्क्रिप्शन

Jan 06, 2025 07:19 PM IST

Parmeshwar Metal IPO GMP : नव्या वर्षातही आयपीओचा धडाका सुरूच असून आज गुंतवणुकीसाठी बंद झालेल्या परमेश्वर मेटलच्या आयपीओला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

परमेश्वर मेटलच्या आयपीओवर जनताजनार्दन फिदा; तब्बल ६०० पटीहून जास्त मिळालं सबस्क्रिप्शन
परमेश्वर मेटलच्या आयपीओवर जनताजनार्दन फिदा; तब्बल ६०० पटीहून जास्त मिळालं सबस्क्रिप्शन

IPO News in Marathi : तांब्याच्या धातूच्या पुनर्वापराशी संबंधित परमेश्वर मेटल कंपनीच्या आयपीओला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. परमेश्वर मेटलचा आयपीओ ६०० पटीहून जास्त सब्सक्राइब झाला आहे. ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअरचा बोलबाला असून हे शेअर्स ६५ टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर व्यवहार करत आहेत. 

परमेश्वर मेटलच्या आयपीओचा एकूण आकार २४.७४ कोटी रुपये आहे. परमेश्वर मेटलचे शेअर्स गुरुवारी, ९ जानेवारी रोजी मुंबई शेअर बाजाराच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होतील. कंपनीचा आयपीओ २ जानेवारी रोजी विक्रीसाठी खुला झाला.

परमेश्वर मेटलच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत ६१ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) सध्या ४० रुपयांवर सुरू आहे. सध्याच्या जीएमपीचा विचार करता परमेश्वर मेटलचे शेअर्स १०१ रुपयांच्या रेंजमध्ये लिस्ट होऊ शकतात. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये परमेश्वर मेटलचे शेअर्स मिळतील, त्यांना लिस्टिंगच्या दिवशी ६५ टक्क्यांहून अधिक परताव्याची अपेक्षा असू शकते. कंपनीच्या आयपीओमधील शेअर्सचे वाटप ७ जानेवारी २०२५ रोजी अंतिम होणार आहे.

कंपनीचा आयपीओ ६०७ पटीनं सब्सक्राइब

परमेश्वर मेटलचा आयपीओ ६०७.०६ पट सब्सक्राइब झाला आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ५९७.१ पट सब्सक्राइब झाला आहे. तर, नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NII) श्रेणीत १२०२.७९ पट सबस्क्रिप्शन मिळालं आहे. तर क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) कॅटेगरीत १७७.३२ पट सब्सक्रिप्शन मिळालं आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना केवळ एका लॉटसाठी बोली लावता आली. आयपीओच्या एका लॉटमध्ये २००० शेअर्स होते. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये १,२२,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागली आहे.

काय करते ही कंपनी?

परमेश्वर मेटल या कंपनीचा व्यवसाय ऑगस्ट २०१६ मध्ये सुरू झाला. परमेश्वर मेटल लिमिटेड तांब्याच्या भंगाराचा पुनर्वापर करून तांब्याच्या तारा आणि रॉड तयार करते. कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट गुजरातमधील दहेगामा इथं आहे. कंपनीची उत्पादनं पॉवर केबल, वायर बिल्डिंग, ट्रान्सफॉर्मर, ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री आणि घरगुती केबलमध्ये वापरली जातात.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner