मराठी बातम्या  /  बिझनेस  /  OYO layoff : ओयो कंपनीही करणार कर्मचारी कपात,६०० कर्मचाऱ्यांची होणार छाटनी

OYO layoff : ओयो कंपनीही करणार कर्मचारी कपात,६०० कर्मचाऱ्यांची होणार छाटनी

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Dec 03, 2022 06:46 PM IST

OYO layoff : अॅपच्या माध्यमातून हाॅटेल सुविधा देणाऱ्या ओयो कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

OYO hotels HT
OYO hotels HT

OYO layoff :  अॅपच्या माध्यमातून हाॅटेल सुविधा देणाऱ्या ओयो कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या मते, अनेक अंतर्गत प्रकल्प बंद करण्यासोबतच टीम मर्जर करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अंदाजे ६०० कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे.

जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर हाॅस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील कंपनी ओयोने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ६०० कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. आजमितीला ओयोच्या संपूर्ण चेनमध्ये अंदाजे ३७०० कर्मचाऱी काम करतात.

सीईओ म्हणाले की,कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूती

ओयो कंपनीचे संस्थापक आणि समुह सीईओ रितेश अग्रवाल म्हणाले की, आम्हाला कर्मचारी कपात करताना दु: ख होत आहे. पण जे कर्मचारी इकडून निघून जातील, त्यांना चांगल्या ठिकाणी पुन्हा नोकरी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

ओयोचे सहामाही निकाल

चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीत कंपनीने ६३ कोटी रुपयांचा करपूर्व नफा नोंदवला. एक वर्षापूर्वी या कालावधीत ओयोला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या सहामाहीत ओयोचा महसूल २४ टक्क्यांनी वाढून २९०५ कोटी रुपये झाला.

ओयोचा आयपीओ लवकरच

ओयो कंपनीने आपला आयपीओ आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे. कंपनीने यासाठी सेबीजवळ दस्तावेज दाखल केले आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीला २०२३ मध्ये येण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel