बीएसएनएलने पुद्दुचेरीमध्ये सुरू केली मोबाइलसाठी फ्री इंट्रानेट टीव्ही, वाय-फाय रोमिंग आणि फायबर-आधारित इंट्रानेट टीव्ही
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  बीएसएनएलने पुद्दुचेरीमध्ये सुरू केली मोबाइलसाठी फ्री इंट्रानेट टीव्ही, वाय-फाय रोमिंग आणि फायबर-आधारित इंट्रानेट टीव्ही

बीएसएनएलने पुद्दुचेरीमध्ये सुरू केली मोबाइलसाठी फ्री इंट्रानेट टीव्ही, वाय-फाय रोमिंग आणि फायबर-आधारित इंट्रानेट टीव्ही

Dec 24, 2024 04:59 PM IST

बीएसएनएलच्या इंट्रानेट टीव्ही (BiTV) ने पुद्दुचेरीतील मोबाइल वापरकर्त्यांसाठी प्रीमियम चॅनेलसह ३०० हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल फ्री सादर केले आहे.

BSNLने पुद्दुचेरीमध्ये सुरू केली मोबाइलसाठी फ्री इंट्रानेट टीव्ही
BSNLने पुद्दुचेरीमध्ये सुरू केली मोबाइलसाठी फ्री इंट्रानेट टीव्ही

भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) नुकतीच तीन नव्या उपक्रमाचीं घोषणा केली आहे. बीएसएनएलने पुद्दुचेरीमध्ये मोबाइलसाठी फ्री इंट्रानेट टीव्ही, वाय-फाय रोमिंग आणि फायबर-आधारित इंट्रानेट टीव्ही सुरू करण्याची घोषणा केली आहे. या नव्या उपक्रमाद्वारे भारतातील कोट्यवधी प्रेक्षकांसाठी कनेक्टिव्हिटी आणि मनोरंजनाची एकप्रकारे पुनर्व्याख्या करण्यात आली असल्याचे बीएसएनएलचे म्हणणे आहे. यामुळे पुद्दुचेरीमध्ये सुरू आलेल्या या ग्राहक केंद्रित सेवेद्वारे डिजिटल अनुभव अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक होणार आहे, असे कंपनीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

आता मोबाईलवर पाहा इंट्रानेट टीव्ही (BiTV)

बीएसएनएलचा इंट्रानेट टीव्ही (BiTV) पुद्दुचेरीतील मोबाइल वापरकर्त्यांसाठी प्रीमियम चॅनेलसह ३०० हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल विनामूल्य उपलब्ध करून देणार आहे. ही प्रायोगिक सेवा म्हणून ओटीटीप्लेच्या भागीदारीत पुद्दुचेरीमध्ये सुरू करण्यात आली आहे.

‘प्रेक्षकांना दैनंदिन जीवनात अत्याधुनिक मनोरंजन एकत्रितपणे उपलब्ध करून देण्याची बीएसएनएलची वचनबद्धता यातून दिसून येते. ही सेवा उच्च-गुणवत्तेचे मनोरंजन प्रदान करणार असून  पुद्दुचेरीतील सर्व मोबाइल वापरकर्त्यांना त्यांच्या कोणत्याही प्लॅनमध्ये ही डिजिटल सामग्री सहज आणि मोफत उपलब्ध होणार आहे.’ असं कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे.

BiTVची निवड का?

BiTV निवडण्यामागे अनेक कारणे असल्याचे बीएसएनएलचे म्हणणे आहे.

अनलिमिटेड एंटरटेनमेंट: लाइव्ह टीव्ही व्यतिरिक्त, अनेक भाषांमधील चित्रपट, वेब सीरिज आणि माहितीपटांचा आनंद घ्या.

विनाअडथळ्याचे अविरत तंत्रज्ञान: बीएसएनएलच्या सुरक्षित अशा मोबाइल इंट्रानेटद्वारे संचालित, बीटीव्ही अद्वितिय अशा व्हिडिओ गुणवत्तेसह अखंड स्ट्रीमिंग सेवा प्रदान करते.

• भविष्यातील विस्तार: पुद्दुचेरीनंतर, BiTV जानेवारी २०२५ मध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये सुरू केले जाईल. लवकरच देशव्यापी उपलब्धतेची योजना आहे.

 

रॉबर्ट रवी, सीएमडी, BSNL
रॉबर्ट रवी, सीएमडी, BSNL

बीएसएनएलचे सीएमडी रॉबर्ट रवी म्हणाले, 'आपल्या पार्टनरच्या माध्यमातून बीएसएनएल BiTVद्वारे कोणतेही प्लॅन असलेल्या प्रत्येक ग्राहकाला प्रवासात, कधीही, कुठेही, विनामूल्य मनोरंजन उपलब्ध करून देते. कालबाह्य पीआरबीटी प्रणालीला हे एक परिपूर्ण असे पर्याय बनले आहेत. यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आणि अव्वल दर्जाच्या सामग्रीची सांगड घालण्यात आली आहे. बीएसएनएल ही अभूतपूर्व सेवा देऊन आपल्या जुन्या पीआरबीटीमध्ये क्रांती घडवून आणणारी पहिली दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी ठरली आहे' 

ओटीटीप्लेचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश मुदलियार  याप्रसंगी म्हणाले, 'नवीन BiTV द्वारे आम्हाला भारतभरातील बीएसएनएल ग्राहकांसाठी जागतिक दर्जाचे मनोरंजन उपलब्ध करून देत असल्याबद्दल अभिमान आहे. आम्ही एकत्रितपणे विविध प्रकार, भाषा आणि क्षेत्रांमध्ये सिनेमा आणि मनोरंजनाची जादू घडवत आहोत. यामुळे भारतात बीएसएनएलचे ग्राहक डिजिटल मनोरंजनाचा अनुभव कसा घेतात याची पुनर्व्याख्या झाली आहे.

अविनाश मुदलियार, सीईओ, सहसंस्थापक, OTTplay
अविनाश मुदलियार, सीईओ, सहसंस्थापक, OTTplay

ओटीटीप्ले प्रीमियम एक ओटीटी एग्रीगेटर आहे जो ३७ प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्म आणि ५००+ लाइव्ह टीव्ही चॅनेल्समधून सामग्री प्रदान केली जाते.ही सामग्री प्रत्येक यूजरच्या अद्वितीय प्राधान्यांवर आधारित वैयक्तिकृत आहेत.

मनडीपट्टू व्हिलेजमध्ये बीएसएनएलची राष्ट्रीय वाय-फाय रोमिंग सुविधा

बीएसएनएलने ऑक्टोबर २०२४ मध्ये देशभरात नाविन्यपूर्ण बीएसएनएल वाय-फाय रोमिंग सुविधा सुरू केली होती. बीएसएनएलने आपली राष्ट्रीय वाय-फाय रोमिंग सुविधा ग्रामीण भागात विस्तारल्याने मनडीपट्टू पूर्णपणे वाय-फाय सक्षम होणारे भारतातील दुसरे गाव बनले आहे.

ही अभिनव सेवा बीएसएनएल आणि बिगर बीएसएनएल ग्राहकांना वाय-फाय हॉटस्पॉटच्या अखंड नेटवर्कद्वारे जोडते. बीएसएनएल आणि नॉन-बीएसएनएल या दोन्ही ग्राहकांना अखंडित इंटरनेटचा आनंद घेता येणार आहे. मात्र, ग्राहकाला ही सेवा सक्रिय करण्यासाठी संमती पाठवावी लागणार आहे.

ग्राहक याचा लाभ कसा घेऊ शकतात?

बीएसएनएल एफटीटीएच ग्राहक:

१. कोणत्याही बीएसएनएल वाय-फाय हॉटस्पॉट किंवा देशभरातील कोणत्याही बीएसएनएल एफटीटीएच कनेक्शनवरून आपल्या घरातील इंटरनेट वापरा - केवळ आपल्या होम डेटा खात्यावर शुल्क आकारले जाते.

२. सार्वजनिक ठिकाणी किंवा बीएसएनएलच्या इतर एफटीटीएच घरांमध्ये वाय-फाय वापरा. (देशभरात या जोडण्यांच्या परस्पर वापरासाठी ग्राहकांनी एकवेळ संमती देणे आवश्यक आहे)

३. बीएसएनएल मोबाइल वापरकर्ते : बीएसएनएल एफटीटीएच ग्राहकांव्यतिरिक्त आम्ही बीएसएनएल मोबाइल ग्राहकांनाही ही अखंड हाय स्पीड वायफाय कनेक्टिव्हिटी देत आहोत. बीएसएनएलचे सर्व मोबाइल युजर्स सुद्धा ही सेवा वापरू शकतात.

४ .तुमच्या मोबाइल प्लॅनद्वारे थेट BSNL वाय-फाय हॉटस्पॉटशी कनेक्ट व्हा. एक-वेळ नोंदणीमुळे लॉग इन सोपे आणि जलद होते. हाय-स्पीड डाउनलोडसाठी तुमचा मोबाइल डेटा वापर BSNL FTTH नेटवर्कवर वाढवा.

५. याशिवाय BSNL मोबाइल वापरकर्ते कोणत्याही FTTH होम कनेक्शनवर स्वयंचलितपणे लॉग इन करू शकतात. ते हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी वापरू शकतात.

 

नॉन-बीएसएनएल युजर्स

१. यूपीआयद्वारे पेमेंट करून बीएसएनएलचे हाय स्पीड वाय-फाय हॉटस्पॉट आणि बीएसएनएल एफटीटीएच पॉईंट्स/ एफटीटीएच होम कनेक्शन मिळवा.

रवी म्हणाले, "बीएसएनएलची राष्ट्रीय वाय-फाय रोमिंग ग्रामीण-शहरी दरी कमी करण्यासाठी, प्रत्येक भारतीयाला परवडणारी, हाय-स्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक झेप आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये देशभरात लाँच करण्यात आलेला बीएसएनएलचा इंट्रानेट फायबर-आधारित टीव्ही (आयएफटीव्ही) आता पुद्दुचेरीतील सर्व एफटीटीएच ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. बीएसएनएलच्या मजबूत एफटीटीएच नेटवर्कचा फायदा घेत ५०० हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्स ऑफर करणारी ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे. बीएसएनएलच्या एफटीटीएचच्या सर्व ग्राहकांना या सेवेचा मोफत लाभ घेता येणार आहे. ही सेवा अॅक्टिव्हेट करण्यासाठी ग्राहकाला संमती पाठवावी लागणार आहे.

सेवेची मुख्य वैशिष्ट्ये

1. नो-कॉस्ट अॅक्सेस: कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय प्रीमियम मनोरंजनाचा ग्राहकांना आनंद घेता येणार

2. सुपीरियर स्ट्रीमिंग: बीएसएनएलच्या मजबूत एफटीटीएच नेटवर्कद्वारे संचालित, हाय-डेफिनेशन स्ट्रीमिंग सुनिश्चित करते.

3. ग्राहक संमती: संपूर्ण नियंत्रणासाठी सोप्या ऑप्ट-इन प्रक्रियेसह आयएफटीव्ही सक्रिय करा.

आयएफटीव्हीचे लाँचिंग झाल्यानंतर बीएसएनएलच्या एफटीटीएच ग्राहकांसाठी मनोरंजनाची पुनर्व्याख्या झाली आहे. ही सेवा ग्राहकांना अद्वितीय मूल्य प्रदान करते. मनोरंजनाच्या दृष्टिने आपल्या ग्राहकांसाठी प्रत्येक कनेक्शन लक्षात ठेवण्यासारखे बनवते. ग्राहकांना ही सेवा विनामूल्य उपलब्ध करून देते, असं बीएसएनएलचे सीएमडी रवी म्हणाले.

Whats_app_banner