Oppo Smartphones: ओप्पो रेनो १३ सीरिज चीनमध्ये २५ नोव्हेंबरला लॉन्च होणार असून कंपनी गेल्या आठवडाभरापासून आपल्या आगामी स्मार्टफोनची माहिती शेअर करत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ८३५० चिपसेट असेल आणि यात 16 जीबीपर्यंत रॅम आणि १ टीबीपर्यंत स्टोरेज असेल. दरम्यान, रेनो १३ तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. तर, प्रो मॉडेल चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल, अशी पुष्टी ही स्मार्टफोन कंपनीने केली आहे.
कंपनीने चिनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट वीबोवर केलेल्या पोस्टनुसार, आगामी ओप्पो रेनो १३ बटरफ्लाय पर्पल, गॅलेक्सी ब्लू, मिडनाइट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. कंपनीचे म्हणणे आहे की ओप्पो रेनो प्रो या तीन रंगांमध्ये तसेच एक्सक्लुझिव्ह स्टारलाइट पिंक व्हेरियंटमध्ये येणार आहे. ओप्पोनेही आपल्या आगामी मिडरेंज फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची पुष्टी केली आहे. ओप्पोचे म्हणणे आहे की, आगामी रेनो १३ सीरिज मीडियाटेकच्या डायमेंसिटी ८३५० चिपसेटसह सुसज्ज असेल.
रेनो १३ चे स्टँडर्ड मॉडेल वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशननुसार १२ जीबी + २५६ जीबी, १२ जीबी+ ५१२ जीबी, १५ जीबी रॅम + ५१२ जीबी स्टोरेज आणि १६ जीबी रॅम + १ टीबी स्टोरेज अशा पाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. रेनो १३ प्रो देखील वरील व्हेरियंटप्रमाणेच १६ जीबीपर्यंत रॅम आणि १ टीबीपर्यंत स्टोरेजसह येईल. परंतु, यात १६ जीबी रॅम + २५६ जीबी व्हेरिएंट नसेल.
ओप्पोच्या म्हणण्यानुसार, आगामी रेनो १३ लाइनअपमध्ये १.५ के रिझोल्यूशन डिस्प्ले असेल आणि कंपनीने त्याची हाय-ब्राइटनेस लेव्हल देखील वाढवली आहे. दरम्यान, ओप्पोने असा ही दावा केला आहे की, रेनो १३ सीरिजची बॅटरी आपल्या आधीच्या मॉडेलपेक्षा मोठी असेल आणि पाच वर्षांपर्यंत विश्वासार्ह परफॉर्मन्स देईल.
सध्या फोनबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याचे स्पेसिफिकेशन आणि किंमतीचा नेमका तपशील जाणून घेण्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. भारतासह अन्य जागतिक बाजारपेठांमध्ये कंपनी याला लाँच करणार की नाही, याबाबत कंपनीने सध्या कोणतीही माहिती दिलेली नाही.