Oppo Reno 13 Series: ओप्पोनं लॉन्च केले ५० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेले फोन, झटक्यात होणार चार्ज!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Oppo Reno 13 Series: ओप्पोनं लॉन्च केले ५० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेले फोन, झटक्यात होणार चार्ज!

Oppo Reno 13 Series: ओप्पोनं लॉन्च केले ५० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेले फोन, झटक्यात होणार चार्ज!

Nov 26, 2024 02:04 PM IST

Oppo Reno 13 Series Launched: ओप्पो रेनो १३ सीरिज जागतिक बाजारात लॉन्च करण्यात आली असून या फोनमध्ये १६ जीबीपर्यंत रॅम आणि १ टीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायसह येतात.

ओप्पोनं लॉन्च केले ५० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेले फोन
ओप्पोनं लॉन्च केले ५० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेले फोन

Oppo Reno 13 Series Specs and Price: ओप्पोने आपली ओप्पो रेनो १३ सीरिज बाजारात आणली आहे. या सीरिजमध्ये कंपनी ओप्पो रेनो १३ आणि ओप्पो रेनो १३ प्रो असे दोन फोन ऑफर करत आहे. हे फोन नुकतेच चीनमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. दोन्ही फोन १६ जीबीपर्यंत रॅम आणि १ टीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायासह लॉन्च करण्यात आले आहेत. चीनमध्ये ओप्पो रेनो १३ ची सुरुवातीची किंमत २,६९९ युआन (सुमारे ३१,४०० रुपये) आहे. तर, रेनो १३ प्रो ३३९९ युआन (सुमारे ३९,५३५ रुपये) च्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आला आहे.

चीनमध्ये या फोनची विक्री २९ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. लवकरच हा फोन जागतिक बाजारपेठेतही दाखल होऊ शकतो. ५० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, ८० वॅट फास्ट चार्जिंग आणि डायमेंसिटी ८३५० प्रोसेसरसह कंपनी या फोनमध्ये अनेक शानदार फीचर्स देत आहे. 

ओप्पो रेनो १३: डिस्प्ले

ओप्पो रेनो १३ मध्ये ६.५९ इंचाचा १.५ के फ्लॅट ओएलईडी कर्व्ह्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याची पीक ब्राइटनेस लेव्हल १२०० निट्स आहे.

ओप्पो रेनो १३: स्टोरेज

फोनमध्ये १६ जीबी पर्यंत एलपीडीडीआर ५एक्स रॅम आणि १ टीबीपर्यंत यूएफएस ३.१ स्टोरेज आहे. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये डायमेंसिटी ८३५० चिपसेट देण्यात आला आहे

ओप्पो रेनो १३: कॅमेरा

फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह फोनच्या मागील बाजूस दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये ५० मेगापिक्सलच्या मेनलेन्ससह ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. फोनचा मुख्य कॅमेरा ओआयएस फीचरने सुसज्ज आहे. ओप्पोच्या नव्या फोनमध्ये सेल्फीसाठी ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ओप्पो रेनो १३: कनेक्टिव्हिटी

या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह या फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी ५६०० एमएएचची आहे. ही बॅटरी ८० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ओएसबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित कलरओएस १४ वर काम करतो.

ओप्पो रेनो १३ प्रो: डिस्प्ले

या फोनमध्ये कंपनी १.५ के रिझोल्यूशनसह ६.८३ इंचाचा ओएलईडी कर्व्ड डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि १२०० नाइट्सची पीक ब्राइटनेस लेव्हल सपोर्ट करतो. 

ओप्पो रेनो १३ प्रो: स्टोरेज

यात डायमेंसिटी ८३५० चिपसेटसह १६ जीबीपर्यंत एलपीडीडीआर ५ एक्स रॅम आणि १ टीबीपर्यंत यूएफएस ३.१ स्टोरेज आहे. कंपनी फोनच्या मागील बाजूस तीन कॅमेरे देत आहे.

ओप्पो रेनो १३ प्रो: कॅमेरा

या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य ओआयएस कॅमेरासह ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि ५० मेगापिक्सलचा ३.५ एक्स पेरिस्कोप कॅमेरा आहे. या फोनमध्ये कंपनी ५० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देत आहे.

ओप्पो रेनो १३ प्रो: बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

फोनची बॅटरी ५८०० एमएएच ची आहे. ही बॅटरी ८० वॅट वायर्ड आणि ५० वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित कलरओएस १४ वरही काम करतो.

Whats_app_banner