Oppo Reno 13 Series : अंडरवॉटर फोटोग्राफीसाठी ओप्पोनं लॉन्च केले ‘हे’ दोन धमाकेदार फोन!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Oppo Reno 13 Series : अंडरवॉटर फोटोग्राफीसाठी ओप्पोनं लॉन्च केले ‘हे’ दोन धमाकेदार फोन!

Oppo Reno 13 Series : अंडरवॉटर फोटोग्राफीसाठी ओप्पोनं लॉन्च केले ‘हे’ दोन धमाकेदार फोन!

Jan 09, 2025 09:59 PM IST

Oppo Reno 13 Series Launched: ओप्पोने आपली नवी ओप्पो रेनो १३ सीरिज भारतात लॉन्च केली आहे. या सीरिजमध्ये ओप्पो रेनो १३ आणि रेनो १३ प्रो या दोन स्मार्टफोन मॉडेल्सचा समावेश आहे.

अंडरवॉटर फोटोग्राफीसाठी ओप्पोनं लॉन्च केले ‘हे’ दोन धमाकेदार फोन!
अंडरवॉटर फोटोग्राफीसाठी ओप्पोनं लॉन्च केले ‘हे’ दोन धमाकेदार फोन!

Oppo Reno 13 Series Launched in India: ओप्पोने आपली नवी ओप्पो रेनो १३ सीरिज भारतात लॉन्च केली आहे. या सीरिजमध्ये ओप्पो रेनो १३ आणि रेनो १३ प्रो या दोन स्मार्टफोन मॉडेल्सचा समावेश आहे. दोन्ही फोनमध्ये अनेक फीचर्स सारखेच आहेत. खरे तर, या दोन्ही फोनमध्ये कस्टम डायमेंसिटी ८३५० चिपसेट, ५० मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा आणि ट्रिपल आयपी रेटिंग मिळते. हे फोन २ मीटर खोल पाण्यात ३० मिनिटांपर्यंत व्हिडिओ शूट करू शकतात. या फोनमध्ये एरोस्पेस ग्रेड अ‍ॅल्युमिनियम फ्रेम देण्यात आली आहे. याशिवाय, सेल्फीसाठी दोन्ही फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

ओप्पो रेनो १३ आणि १३ प्रो हे दोन्ही दोन कॉन्फिगरेशन आणि दोन कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. व्हॅनिला मॉडेल म्हणजेच रेनो १३ आयव्हरी व्हाईट आणि ल्युमिनस ब्लू रंगात लाँच करण्यात आले आहे, तर प्रो मॉडेल मिस्ट लॅव्हेंडर आणि ग्रॅफाइट ग्रे सारख्या रंगांमध्ये लाँच करण्यात आले आहे.

किंमत:

ओप्पो रेनो १३ च्या ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३७ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. ओप्पो रेनो १३ प्रोच्या १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४९ हजार ९९९ रुपये आणि १२ जीबी रॅम + ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५४ हजार ९९९ रुपये आहे.

कधीपासून उपलब्ध?

दरम्यान, ११ जानेवारीपासून दुपारी १२ वाजता हे स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध होतील. फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल, क्रोमा, वि्जय सेल्स, पूर्विका मोबाइल्स आणि इतरांकडून खरेदी करता येणार आहे. अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय, एचडीएफसी, आयडीएफसी, फेडरल बँक, डीबीएस आणि इतर बँकांच्या माध्यमातून पेमेंट केल्यास १० टक्के इन्स्टंट कॅशबॅक मिळत आहे.

डिस्प्ले:

दोन्ही फोन ड्युअल सिम (नॅनो) सपोर्टसह येतात आणि अँड्रॉइड १५ वर आधारित कलरओएस १५ वर चालतात. प्रो मॉडेलमध्ये ६.८३ इंचाचा 1.5K डिस्प्ले मिळतो. तर, स्टँडर्ड मॉडेलमध्ये ६.५९ इंचाचा फुल-एचडी प्लस (1256×2760 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले आहे देण्यात आला आहे

कॅमेरा:

दोन्ही फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. प्रो मॉडेलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ओआयएससह ५० मेगापिक्सलसोनी आयएमएक्स ८९० १/१.५६ इंच मुख्य कॅमेरा, ३.५ एक्स ऑप्टिकल झूम, १२० एक्स पर्यंत डिजिटल झूम आणि ओआयएससह ५० मेगापिक्सलचा जेएन ५ टेलिफोटो सेन्सर आणि ८ मेगापिक्सलचा ओव्ही ०८ डी सेन्सर आहे. तर, ओप्पो रेनो १३ मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ओआयएससह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. 

बॅटरी:

प्रो मॉडेलमध्ये ५८०० वॅट सुपरव्हीओसी वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह ८० एमएएच बॅटरी आहे. तर व्हॅनिला मॉडेलमध्ये ८० वॅट सुपरव्हीओसी वायर्ड चार्जिंग सपोर्टसह ५६०० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

कनेक्टिव्हिटी:

ओप्पो रेनो १३ 5G सीरिजमध्ये उपलब्ध कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.४, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. या फोनच्या मदतीने २ मीटर खोल पाण्यात ३० मिनिटे फोटोग्राफी करता येते, असा कंपनीचा दावा आहे. यात विशेषतः अंडरवॉटर मोड आहे. या फोनमध्ये ओप्पोच्या कस्टम-डेव्हलप्ड एक्स १ नेटवर्क चिपचा समावेश आहे, जो अधिक चांगले सिग्नल कव्हरेज प्रदान करण्याचा दावा करतो.

Whats_app_banner