Budget Smartphones : १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकतेच ओप्पो आणि पोको कंपनीने त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन ओप्पो के १२एक्स 5G आणि पोको एम ६ प्लस 5G लॉन्च केले. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये उत्तम असे फीचर्स मिळत आहेत. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये मिळणाऱ्या फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
डिस्प्ले:
ओप्पो के १२ एक्स 5G मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १००० निट्स पीक ब्राइटनेससह ६.६७ इंचाचा एचडी + एलसीडी डिस्प्ले आहे. यात ड्युअल-प्रबलित पांडा ग्लास प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे. तर, पोको एम ५ प्लस 5G मध्ये १२० हर्ट्झ अॅडॉप्टिव्हसिंक रिफ्रेश रेटसह ६.७९ इंचाचा एलसीडी एफएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे.
कॅमेरा:
फोटोग्राफीच्या दृष्टीने ओप्पो के१२एक्स 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात ३२ मेगापिक्सलचा एआय प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. दुसरीकडे, पोको एम 6 प्लस 5G मध्ये सॅमसंग आयसोसेल एचएम ६ सेन्सरसह १०८ एमपी ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ओप्पो स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तर, पोको फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
ओप्पो के १२ एक्स 5G मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ६ हजार ३०० प्रोसेसरसह ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज आहे. दुसरीकडे, पोको एम ६ प्लस 5G क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४ जेन २ एई चिपसेटसह ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी यूएफएस २.२ स्टोरेजसह सुसज्ज आहे.
बॅटरी:
ओप्पो के१२एक्स ५जी मध्ये ५ हजर १०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी ४५ वॅट सुपरवूक फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते. पोको एम ६ प्लस 5G मध्ये ३३ वॅट फास्ट चार्जिंगसह ५ हजार ३० एमएएच चा सपोर्ट देण्यात आला आहे.
ओप्पो के १२ एक्स 5G ची किंमत ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेजसाठी १२ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेजसाठी १५ हजार ९९९ रुपये आहे. पोको एम ६ प्लस 5G ६ जीबी रॅम + १२८ जीबी आणि ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे १२ हजार ९९९ रुपये आणि १४ हजार ४९९९ रुपये आहे.