Oppo K12x 5G Launched In India: ओप्पोने आपल्या के सीरिज लाइनअपचा विस्तार करत भारतीय बाजारपेठेत के१२एक्स 5G लॉन्च केला आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये एमआयएल-एसटीडी- ८१० एच प्रमाणपत्र आहे, जे सुनिश्चित करते की हा फोन कोणत्याही तापमानाचा सामना करू शकतो. पाण्याच्या प्रतिकारासाठी या फोनला आयपी ५४ रेटिंग मिळाले आहेत.
ओप्पो के१२एक्स 5G मध्ये १६०४ बाय ७२० पिक्सल रिझोल्यूशनअसलेला ६.६७ इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. स्क्रीन 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. फोनमध्ये स्प्लॅश टच टेक्नॉलॉजी देखील आहे, ज्यामुळे वापरकर्ते ओल्या हातांनी स्मार्टफोन वापरू शकतात. मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० चिपसेटद्वारे संचालित, ओप्पो के १२ एक्स 5G मध्ये ८ जीबीपर्यंत LPDDR4X रॅम आहे आणि अॅप्स, मीडिया आणि फाइल्ससाठी २५६ जीबीपर्यंत यूएफएस २.२ अंतर्गत स्टोरेज प्रदान करते. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ वर कलरओएस १४ सह चालतो.
फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सिस्टीम देण्यात आली असून यात ३२ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे. फ्रंट फेसिंग फोटोग्राफी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. ओप्पो के १२ एक्स 5G मध्ये ५ हजार १०० एमएएच बॅटरी आणि ४५ वॅट सुपरव्हीओओसी चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
ओप्पो के १२ एक्स 5G साठी कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, ड्युअल 4G व्हीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ ५.१, जीपीएस, ग्लोनास आणि यूएसबी टाइप-सी यांचा समावेश आहे. अतिरिक्त सुरक्षेसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनचे वजन १८६ ग्रॅम आहे.
ओप्पो के १२ एक्स 5G दोन रंगांमध्ये येतो, ज्यात ब्रीज ब्लू आणि मिडनाइट व्हायलेट यांचा समावेश आहे. ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १२ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी + २५६ जीबी मॉडेलची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन २ ऑगस्टपासून फ्लिपकार्ट, ओप्पो इंडियाच्या ऑनलाइन स्टोअर्स आणि ऑफलाइन डीलर्सवर उपलब्ध होणार आहे. लॉन्चिंगच्या दिवशी ग्राहकांना निवडक बँकांमध्ये एक हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो आणि तीन महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय निवडता येईल.
संबंधित बातम्या