Upcoming Smartphones: ओप्पोपासून ते शाओमीपर्यंत; दमदार फीचर्ससह 'या' आठवड्यात लॉन्च होतायेत 'हे' स्मार्टफोन!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Upcoming Smartphones: ओप्पोपासून ते शाओमीपर्यंत; दमदार फीचर्ससह 'या' आठवड्यात लॉन्च होतायेत 'हे' स्मार्टफोन!

Upcoming Smartphones: ओप्पोपासून ते शाओमीपर्यंत; दमदार फीचर्ससह 'या' आठवड्यात लॉन्च होतायेत 'हे' स्मार्टफोन!

Updated Jun 11, 2024 07:10 PM IST

Upcoming Smartphones In India: ओप्पो एफ २७ प्रो प्लस 5G, शाओमी १४ सीआयव्हीआयसह या आठवड्यात लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊयात.

भारतात या आठवड्यात लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनची यादी पाहुयात.
भारतात या आठवड्यात लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनची यादी पाहुयात. (Oppo)

Upcoming Smartphones List: बजेटपासून ते फ्लॅगशिप स्मार्टफोनपर्यंत या वर्षी अनेक स्मार्टफोन बाजारात दाखल झाले. यात आणखी दमदार स्मार्टफोनचा समावेश होणार आहे. या आठवड्यात ओप्पो, शाओमी, ऑनर यांसारख्या कंपनीचे स्मार्टफोन बाजारात लॉन्च होणार आहेत. नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी गूड न्यूज आहे. या आठवड्यात लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी जाणून घेऊयात.

१) ओप्पो एफ २७ प्रो प्लस 5 जी:

ओप्पोने खुलासा केला की, आयपी ६९ रेटिंग प्राप्त करणारा हा भारतातील पहिला स्मार्टफोन असेल. ज्यामुळे डिव्हाइस पाणी आणि धूळ-प्रतिरोधक बनते. ओप्पो एफ २७ प्रो प्लसमध्ये रेनप्रूफ प्रोटेक्शन, स्मार्टफोनला कोणत्याही शारीरिक नुकसानापासून वाचवण्यासाठी ३६०° आर्मर बॉडीसह टिकाऊपणा आणि गोरिल्ला ग्लास व्हिक्टस २ द्वारे संरक्षित डिस्प्ले मिळतो. या स्मार्टफोनमध्ये व्हेगन लेदर बॅक देण्यात आला आहे. हा फोन १३ जून २०२४ रोजी बाजारात दाखल होईल.

२) शाओमी १४ सीआयव्हीआय:

या स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात सिनेमॅटिक एचडीआर सपोर्टसह 50 मेगापिक्सल सुमिलक्स कॅमेरा, २ एक्स ऑप्टिकल झूमसह ५० मेगापिक्सल टेलिफोटो कॅमेरा आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा असू शकतो. याव्यतिरिक्त, हे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ एस जेन ३ प्रोसेसरसह सुसज्ज असण्याची अपेक्षा आहे. शाओमी १४ सीआयव्हीआय १२ जून २०२४ रोजी ५० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च होणार आहे.

३) ऑनर २०० सीरिज:

नव्या सीरिजमध्ये ऑनर २०० आणि २०० प्रो या दोन मॉडेल्सचा समावेश असण्याची शक्यता आहे. युरोपियन आणि चिनी बाजारपेठेत लाँचिंगची पुष्टी झाली असली तरी हा स्मार्टफोन भारतात कधी लॉन्च होईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. एचटेकच्या एक्झिक्युटिव्हकडून नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याचे संकेत देणारे अनेक रिपोर्ट आहेत आणि ही ऑनर २०० सीरिज असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची घोषणा फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये करण्यात येणार असून प्रो व्हर्जनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर असण्याची शक्यता आहे.

४) ऑनर मॅजिक व्ही फ्लिप:

ऑनर आपला नवा फोल्डेबल स्मार्टफोन चीनमध्ये १३ जून रोजीलॉन्च करणार आहे. हा क्लॅमशेल फोल्डेबल मॉडेल आहे. यात ३.४ इंचाचा कव्हर डिस्प्ले आणि ६.७ इंचाचा मेन डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर आणि ४ हजार ५०० एमएएच क्षमता असलेली ड्युअल बॅटरी असण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner