स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो आज भरतात नवीन एफ-सीरिज स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. मात्र, अधिकृत लाँचिंगपूर्वीच एका टिप्सटरने त्याचे रेंडर, स्पेक्स, फीचर्स आणि बरेच काही लीक केले आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर ओप्पो एफ २५ प्रोला टीज करण्यास सुरुवात केली आहे. वेबसाइटवर आपण स्मार्टफोनची काही वैशिष्ट्ये आणि अपेक्षित डिझाइन देखील पाहू शकतो, ज्याची अधिकृत घोषणा आज केली जाईल.
मुकुल शर्मा यांच्या एक्स पोस्टनुसार, ओप्पो एफ २५ प्रोमध्ये स्लिम बेजलसह फ्लॅट डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. फोनचे वजन १७७ ग्रॅम असण्याची शक्यता आहे. मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी डिस्प्लेवर पंच-होल कॅमेरा मिळू शकतो. ओप्पो एफ २५ प्रोमध्ये १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा अमोलेड डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.
फोनमध्ये ८ जीबी रॅमसह १२८ जीबी आणि २५६ जीबी असे दोन स्टोरेज व्हेरियंट मिळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही व्हेरियंट २ टीबीपर्यंत एक्सपेंडेबल स्टोरेजला सपोर्ट करण्याची शक्यता आहे. ओप्पो एफ २५ प्रो अँड्रॉइड १४ वर आधारित कलर ओएस १४ वर चालण्याची शक्यता आहे. यात ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी असू शकते, जी ६७ वॅट चार्जिंगला सपोर्ट करेल. ओप्पोच्या अधिकृत वेबसाइटवरही चार्जिंग सपोर्टचा उल्लेख करण्यात आला आहे.
लीक झालेल्या माहितीनुसार, ओप्पो एफ२५ प्रोची बॉक्स किंमत २८ हजार ९९९ रुपये असण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. ओप्पोने नव्या एफ-सीरिज स्मार्टफोनसाठी काय योजना आखली आहे, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
संबंधित बातम्या