Oppo A80 5G Price and Features: ओप्पोने नेदरलँडमध्ये त्यांचा नवा स्मार्टफोन ए८० 5G लॉन्च केला आहे. हे मॉडेल रिब्रँडेड ओप्पो ए३ प्रो आहे, जे या वर्षाच्या सुरुवातीला १७ हजार ९९९ रुपयांना लॉन्च करण्यात आले. ओप्पो ए८० 5G मध्ये ६.६७ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले, ५ हजार १०० एमएएचची दमदार बॅटरी आणि ५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरासह अनेक वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग पाहूयात ओप्पो ए८० 5G मधील फीचर्स जाणून घेऊयात.
ओप्पो ए८० 5G मध्ये पंच-होल डिझाइनसह ६.६७ इंचाची आयपीएस एलसीडी स्क्रीन आहे. हे एचडी+ रिझोल्यूशनला सपोर्ट करते आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट ऑफर करते. डिस्प्ले १००० निट्सची पीक ब्राइटनेस प्राप्त करतो. हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित कलरओएस १४ वर चालतो आणि सुरक्षेसाठी साइड- माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरचा समावेश आहे.
या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. रियर सेटअपमध्ये ५० एमपी मुख्य कॅमेरा आणि २ एमपी सेकंडरी कॅमेरा आहे. ओप्पो ए ८० 5G डायमेंसिटी ६३०० चिपसेट आहे, ज्यात ५१०० एमएएच बॅटरी आहे, जी ४५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात ८ जीबी एलपीडीडीआर ४एक्स रॅम आणि २५६ जीबी यूएफएस २.२ स्टोरेज आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम सपोर्ट, वाय-फाय ५, ब्लूटूथ ५.३, यूएसबी-सी पोर्ट आणि ३.५ एमएम ऑडिओ जॅक चा समावेश आहे. ओप्पो ए ८० 5G ला आयपी ५४ रेटिंग देखील देण्यात आले आहे, ज्यामुळे ओल्या परिस्थितीत वापरण्याची परवानगी मिळते. ओप्पो ए८० 5G चे वजन १८६ ग्रॅम आहे.
ओप्पो ए ८० 5G ची किंमत नेदरलँड्समध्ये २९९ युरो (अंदाजे २७ हजार ६५७ रुपये) आहे. हा फोन स्टारी ब्लॅक आणि पर्पल मध्ये उपलब्ध असला तरी ओप्पोच्या डच वेबसाईटवर फक्त ब्लॅक व्हेरियंट लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन भारतात कधी लॉन्च होईल, याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. पण लवकरच हा फोन भारतीय स्मार्टफोन बाजारात दिसण्याची शक्यता आहे.