Oppo A3 Pro Price: ओप्पो ए३ प्रो लवकरच भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. असे म्हटले जात आहे की हँडसेटचे भारतीय व्हर्जन फोनच्या चिनी व्हेरियंटपेक्षा वेगळे असेल. वेगवेगळ्या स्पेसिफिकेशन्ससोबतच हँडसेटच्या डिझाइनमध्येही बदल करण्याची चर्चा आहे. चीनमध्ये ओप्पो ए ३ प्रोचा व्हेरियंट भारतात ओप्पो एफ २७ प्रो + ५ जी या नावाने लाँच करण्यात आला आहे. लीक झालेल्या फोटोंवरून हँडसेटचे डिझाइनही वेगळे असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, हा स्मार्टफोन भारतात कधी लॉन्च होईल? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
टिप्सटर सुधांशू (@Sudhanshu1414) यांच्या मते, ओप्पो ए ३ प्रोच्या बेस ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १७ हजार ९९९ रुपये असण्याची शक्यता आहे. तर, ८ जीबी + २५६ जीबी व्हेरियंटची किंमत १९ हजार ९९९ रुपये असण्याची शक्यता आहे.
लीक झालेल्या माहितीनुसार, ओप्पो ए3 प्रोच्या भारतीय व्हेरियंटमध्ये ६.६ इंचाची १२० हर्ट्झ एलसीडी स्क्रीन असण्याची शक्यता आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० एसओसी प्रोसेसर देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आला आहे. हे अँड्रॉइड १४-आधारित फनटच १४ सह शिप करू शकते, असा अंदाज आहे.
कॅमेरा प्रेमींसाठी या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा रिअर सेन्सर आणि अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह ८ मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सेलसेन्सरने सुसज्ज असू शकतो.
ओप्पो ए3 प्रो मध्ये ४५ वॉट सुपरव्हीओसी फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह ५ हजार १०० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हँडसेटच्या लीक झालेल्या रिटेल बॉक्समध्ये ३६० डिग्री डॅमेज-प्रूफ आर्मर बॉडी, तसेच स्प्लॅश टच सपोर्ट मिळेल.
संबंधित बातम्या