Onion Price : टोमॅटोच्या किंमती वाढतच आहेत. तर दुसरीकडे आता कांद्याच्या किंमती आॅगस्ट अखेरीपर्यंत तीन पट वाढण्याची शक्यता आहे. पुरवठ्या साखळीत टंचाई निर्माण झाल्यामुळे कांद्याच्या किंमती आॅगस्ट अखेरीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबरपर्यंत किंमतीत दोन ते अडीच पट वाढ होण्याची शक्यता आहे. किंमत ६० ते ७० रुपये प्रति कितोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे. ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी देशातील एक किलो कांद्याचा सरासरी भाव २७ रुपये किलो होता.कांद्याचा कमाल भाव ६० रुपये आणि किमान भाव १० रुपये प्रति किलो होता. सगळ्यात महाग टोमॅटोची किमत २५७ रुपये प्रति किलो तर सर्वात स्वस्त किंमत ४० रुपये प्रति किलोंच्या घरात होती. तत्पूर्वी देशातील टोमॅटोची कमाल किंमत १४० रुपये होती.
क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड अॅनालिटिक्सच्या अहवालानुसार, आॅक्टोबरपासून खरीप पिकाची आवक सुरू झाल्याने कांद्याचा पुरवठा चांगला होईल. परिणामी, किंमतीत घट होऊ शकते. मागणी आणि पुरवठा यांच्यातील असंतुलनाचा परिणाम आॅगस्टच्या अखेरीपर्यंत दिसू शकतो. ग्राऊंड लेव्हलवर सप्टेंबरच्या सुरूवातीपासून किमतींमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. हे दर ६० ते ७० रुपये प्रति किलोंच्या घरात जाऊ शकतात. दरम्यान कांद्याच्या किंमती २०२० च्या उच्चतम पातळीपेक्षाही खाली राहतील असा अंदाज आहे.
अहवालानुसार, रब्बी पिक वर्गात मोडणाऱ्या कांद्याच्या साठवण आणि विक्रीत दोन महिन्यात घट होऊ शकते. त्यामुळे खुल्या बाजारात रब्बी स्टाॅकमध्ये सप्टेंबरच्या तुलनेत आॅगस्टमध्ये घट होईल. त्यामुळे कांद्याच्या विक्रीत वाढ होईल. रिपोर्टमध्ये आॅक्टोबरपासून खरीप पिकाची आवक सुरू झाल्याने कांद्याचा पुरवठा नियमित होईल. परिणामी किंमती घट होईल.
संबंधित बातम्या