ongc recruitment 2023 : पदवी व पदविका धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची तेल कंपनी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन अर्थात ओएनजीसीनं (ONGC) अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या अंतर्गत तब्बल २५०० पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना कंपनीची अधिकृत वेबसाइट ongcindia.com वर जाऊन अर्ज करता येणार आहेत.
प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या भरतीसाठी नोंदणी सुरू झाली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०२३ ही आहे. अर्ज करण्यापूर्वी अर्ज पात्रता, निवड प्रक्रिया इत्यादीच्या तपशीलवार माहितीसाठी संपूर्ण भरती अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख : १ सप्टेंबर २०२३
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० सप्टेंबर २०२३
ONGC निवड परिणाम : ५ ऑक्टोबर २०२३
वेगवेगळ्या पदांसाठी पात्रतेचे निकष वेगळे आहेत. ते पुढीलप्रमाणे…
पदवीधर प्रशिक्षणार्थी : बीए / बीकॉम / बीएससी / बीबीए / बीई / बीटेक
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी : १२ वी आणि डिप्लोमा
ट्रेड प्रशिक्षणार्थी : दहावी किंवा बारावी आणि ITI प्रमाणपत्र.
वयोमर्यादा : अर्जदाराचं वय १८ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावं. वय २० सप्टेंबर २०२३ पर्यंतचं मोजलं जाईल.
पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. पात्र उमेदवारांना समान गुण असल्यास अशा परिस्थितीत वय ज्येष्ठतेच्या आधारावर निवड केली जाईल. अधिक माहिती ONGC च्या अधिकृत वेबसाइटवर मिळेल.
मानधन: पदवीधर प्रशिक्षणार्थी - ९,००० रुपये
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी - ८,००० रुपये
ट्रेड प्रशिक्षणार्थी - ७,००० रुपये
ongcindia.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
होमपेजवर अप्रेंटिस रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा
स्वतःची नोंदणी करा आणि ONGC अप्रेंटिस २०२३ साठी नोंदणी फॉर्म भरा
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्जाचं शुल्क भरा
डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या
ओएनजीसी भरतीसाठी डायरेक्ट लिंक : ONGC Apprentice Registration 2023
संबंधित बातम्या