मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ONGC Dividend : करासंदर्भातील वादाचा परिणाम, ओएनसीजी तोट्यात तरी वाटणार इतके टक्के लाभांश

ONGC Dividend : करासंदर्भातील वादाचा परिणाम, ओएनसीजी तोट्यात तरी वाटणार इतके टक्के लाभांश

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 28, 2023 12:34 PM IST

ONGC Dividend : खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या संबंधातील राॅयल्टीवर सेवा कर/जीएसटी लागू नाही, या कायदेशीर मुद्दयावर सध्या विविध मंचावर त्याचा विरोध करणे सुरु आहे.

Dividend declared HT
Dividend declared HT

ONGC Dividend : भारतातील तेल आणि गॅस उत्पादक कंपनी ओएनजीसीने सांगितले की, मार्च २०२३ च्या तिमाही दरम्यान कंपनीला २४७.७० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. विवादित करासंदर्भात १२,१०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची तरतूद केल्याने हे नुकसान झाले आहे. ओएनजीसीला जानेवारी ते मार्च २०२२ दरम्यान ८८५९.५४ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

काय आहे प्रकरण

सर्व्हिस टॅक्स विभागाने जमीनीखालील उत्पादित कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅसवर राज्य आणि केंद्र सरकारला देय़ असलेल्या राॅयल्टीवर जीएसटी देण्याची मागणी केली होती. कंपनीने या मागणीला न्यायालयात आव्हान दिले. हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च २०२३ मध्ये त्यांचा महसूल ५.२ टक्के वाढून ३६,२९३ कोटी रुपये झाला आहे.

यादरम्यान कंपनीच्या संचालक मंडळाने शेअरहोल्डर्सच्या मागणीवरुन आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी प्रत्येकी ५ रुपयांच्या (१०टक्के) फेसव्हॅल्यूवर ०.५ रुपयांचा अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे.गेल्या १२ महिन्यांत, ONGC ने प्रति शेअर १४ रुपये इक्विटी लाभांश दिला आहे. ज्याचा परिणाम शेअर्सच्या सध्याच्या किंमतींचा विचार केल्यास ८.९२% लाभांश उत्पन्न आहे.

WhatsApp channel

विभाग