OnePlus Open Apex Edition launched in India: वनप्लस ओपनच्या जवळपास एक वर्षानंतर कंपनीने फोल्डेबल स्मार्टफोनचे आणखी एक व्हेरियंट काही नवीन फीचर्ससह लॉन्च केले आहे. वनप्लस ओपन एपेक्स एडिशनमध्ये नवीन कलर व्हेरियंट, ग्रेटर स्टोरेज, सिक्युरिटी चिप आणि प्रायव्हसी मोडचा समावेश आहे. वनप्लस ओपनचा हा खास व्हेरियंट नव्या लूकसह येतो. याशिवाय, या फोनमध्ये अपग्रेड फिचर्स मिळतात. वनप्लसच्या या नव्या फोनबाबत जाणून घ्या.
वनप्लस ओपन एपेक्स एडिशनमध्ये अप्रतिम फिनिशसह नवीन क्रिमसन शॅडो कलर व्हेरिएंट देण्यात आला आहे आणि लेदर बॅक पॅनेल देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन १६ जीबी रॅम आणि १ टीबी इंटरनल मेमरीच्या एका स्टोरेज व्हेरियंटसह सादर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, विशेष व्हेरिएंटमध्ये वैयक्तिक डेटाच्या वाढीव संरक्षणासाठी डेडिकेटेड सिक्युरिटी चिप देखील देण्यात आली आहे. वनप्लस ओपन एपेक्स एडिशनमध्ये एक नवीन व्हीआयपी मोड मिळत आहे. वनप्लसने स्मार्टफोनमध्ये एआय इरेजर आणि एआय स्मार्ट कटआऊटसारखे काही एआय फीचर्स देखील सादर केले आहेत.
वनप्लस ओपन एपेक्स एडिशनमध्ये६.३१ इंचाचा 2K एमोलेड कव्हर डिस्प्ले आणि ७.८२ इंचाचा 2K एमोलेड मेन डिस्प्ले आहे. कव्हर डिस्प्लेला सिरॅमिक गार्डने प्रोटेक्टेड केले. मुख्य डिस्प्लेमध्ये अल्ट्रा थिन ग्लास प्रोटेक्शन आहे. स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ४८ एमपीचा मुख्य कॅमेरा, ४८ एमपीचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि ३ एक्स ऑप्टिकल झूमसह ६४ एमपी टेलिफोटो कॅमेरा आहे. यात ड्युअल फ्रंट कॅमेरा आहे, ज्यात २० एमपी मेन आणि३२ एमपी सेकंडरी सेल्फी कॅमेरे आहेत. वनप्लस ओपन एपेक्स एडिशनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट आणि एड्रेनो ७४० जीपीयू आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ वर आधारित ऑक्सिजनओएस १४.० वर चालतो. या फोनमध्ये ४ हजार ८०५ एमएएच बॅटरी मिळत आहे.
किंमत वनप्लस ओपन एपेक्स एडिशनच्या १६ जीबी रॅम आणि १ टीबी यूएफएस ४.० स्टोरेजची किंमत १ लाख ४९ हजार ९९९ रुपये आहे. भारतात वनप्लस ओपन व्हेरियंटची विक्री वनप्लसच्या अधिकृत वेबसाइटवर १० ऑगस्टपासून सुरू होणार आहे.