OnePlus Nord CE 4 to Launch in India: वनप्लसने आपला नवीन स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड सीई ४ येत्या १ एप्रिल २०२४ रोजी भारतात लाँच करणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. या वर्षात भारतीय बाजारात लॉन्च होणारा वनप्लसचा दुसरा फोन आहे. हा फोन बाजारातील पोको एक्स ६, नथिंग फोन २ ए आणि नवीन आयक्यूओ झेड ९ 5G सारख्या सेगमेंटला टक्कर देण्याची अपेक्षा आहे. या फोनमध्ये ग्राहकांना कोणकोणती फीचर्स मिळू शकतात, हे पाहुयात.
लीक झालेल्या माहितीनुसार, वनप्लस नॉर्ड सीई ४ हा २५ हजारांत लॉन्च होण्याची शक्यता आहे. वनप्लसने शेअर केलेल्या टीझरमध्ये हा फोन डार्क क्रोम आणि सेलाडॉन मार्बल दोन रंगात बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये एलईडी रिंग फ्लॅशसह मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. टीझर इमेजमध्ये स्मार्टफोनच्या उजव्या बाजूला व्हॉल्यूम आणि पॉवर बटण असल्याचे देखील सूचित केले गेले आहे.
वनप्लस नॉर्ड सीई 4 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ प्रोसेसरवर चालेल याची वनप्लसने यापूर्वीच घोषणा केली आहे. लीक माहितीनुसार, वनप्लस नॉर्ड सीई ४ मध्ये ६.७ इंचाचा एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ग्राहकांना १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेर मिळण्याची शक्यता आहे.
वनप्लस नॉर्ड सीई ४ वनप्लस नॉर्ड सीई ३ चा अपडेट व्हर्जन असण्याची शक्यता आहे. ज्यात ६.७ इंच फुल-एचडी+ एमोलेड डिस्प्ले आणि ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली.
वनप्लस नॉर्ड सीई ४ भारतात ०१ एप्रिल रोजी संध्याकाळी ६.३० वाजता लाँच होणार आहे. स्मार्टफोनचे डेडिकेटेड मायक्रोसाइट आणि अॅमेझॉन पेज आधीच लाइव्ह आहे, जिथे इच्छुक खरेदीदार 'नोटिफाई मी' पर्यायाद्वारे अलर्टसाठी साइन अप करू शकतात.