OnePlus Nord CE 4 Price and Specs: वनप्लस कंपनीचा नवा स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड सीई ४ 5G येत्या १ एप्रिल २०२४ रोजी भारतीय बाजारात दाखल होणार आहे. मात्र, यापूर्वीच या स्मार्टफोनमधील फीचर्स लीक झाली आहेत. टिप्सटर अभिषेक यादवने अधिकृत लॉन्च इव्हेंटच्या काही दिवस आधी नवीन वनप्लस 5G फोनच्या किंमतीबद्दल माहिती दिली होती. या स्मार्टफोनमध्ये नेमकी कोणती फीचर्स मिळणार आहेत, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
लीक झालेल्या माहितीनुसार, वनप्लस नॉर्ड सीई ४ ची (८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज) किंमत २४ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होऊ शकते. तसेच ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत २६ हजार ९९९ रुपये असण्याची शक्यता आहे. मात्र, किंमतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
भारतात वनप्लस नॉर्ड सीई ३ 5G ८ जीबी रॅम+ १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत २६ हजार 999 रुपये आणि १२ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २८ हजार ९९९ रुपये आहे. वनप्लस नॉर्ड सीई ४ मध्ये त्यांच्या जुन्या मॉडेल तुलनेत मोठी बॅटरी असू शकतो. हा डिस्प्ले आधीच्या मॉडेलसारखाच राहणार असला तरी कॅमेरा विभागात काही बदल होऊ शकतात.
वनप्लस नॉर्ड सीई ४ मध्ये ६.७ इंचाचा फ्लुइड एमोलेड डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, फोनमध्ये लेटेस्ट ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ चिप असेल. वनप्लस नॉर्ड सीई ४ मध्ये ५ हजार ५०० एमएएचची हा फोन केवळ २९ मिनिटांत डिव्हाइस १ ते १०० टक्के पूर्ण चार्ज होऊ शकतो. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.