मराठी बातम्या  /  बिझनेस  /  OnePlus Nord CE 4: सुपरफास्ट चार्ज होणारा वनप्लस नॉर्ड सीई ४ फोनचा सेल सुरू, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

OnePlus Nord CE 4: सुपरफास्ट चार्ज होणारा वनप्लस नॉर्ड सीई ४ फोनचा सेल सुरू, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 04, 2024 08:34 PM IST

OnePlus Nord CE 4 Sale: वनप्लस कंपनीचा नवा स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड सीई ४ भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

वनप्लस नॉर्ड सीई ४ आजपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
वनप्लस नॉर्ड सीई ४ आजपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. (OnePlus)

OnePlus New Smartphone: भारतात वनप्लस नॉर्ड सीई ४ (OnePlus Nord CE 4) सेलला आजपासून (४ एप्रिल २०२४) सुरुवात झाली आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या वनप्लस नॉर्ड सीई ३ चा उत्तराधिकारी आहे, जो मिड-रेंज सेगमेंटमध्ये येतो. वनप्लस नॉर्ड सीई ४ च्या काही फीचर्समध्ये १२० हर्ट्झ एमोलेड डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ प्रोसेसर आणि १०० वॅट फास्ट चार्जिंगचा समावेश आहे.  आजपासून हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Flipkart News : फ्लिपकार्टवरून ग्राहकाने मागवला २२ हजाराचा स्मार्टफोन, मात्र बॉक्समध्ये मिळाले चक्क दगड

वनप्लसने देखील फक्त आजसाठी एक एक्सक्लुझिव्ह ऑफर आणली आहे. वनप्लस नॉर्ड सीई ४ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना २ हजार १९९ रुपये किंमतीचा वनप्लस नॉर्ड बड्स २ आर मोफत मिळेल. तसेच २ हजार ५०० रुपयांचा एक्सचेंज बोनसदेखील मिळत आहे. ग्राहकांना एकाच वेळी संपूर्ण रक्कम भरायची नसले, त्यांना ६ महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआय पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Amazon Sale: अ‍ॅमेझॉनची भन्नाट ऑफर, वनप्लस कंपनीचा ५७ हजारांचा फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी!

आजपासून वनप्लस नॉर्ड सीई 4 सेल 

वनप्लस नॉर्ड सीई ४ भारतात १२८ जीबी आणि २५६ जीबी अशा दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत २४  हजार ९९९ रुपये इतकी आहे. तर, २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २६ हजार ९९९ रुपये इतकी आहे. 

Samsung M Series : कुठेही आणि कसाही काढा फोटो! सॅमसंगच्या 'या' फोनमध्ये मिळणार 'नो शेक कॅमेरा' फीचर!

वनप्लस नॉर्ड सीई 4 मधील फीचर्स 

वनप्लस नॉर्ड सीई ४ मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा एफएचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ प्रोसेसर या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी LPDDR4X रॅम आणि २५६ जीबी पर्यंत यूएफएस ३.१ स्टोरेज देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ५० एमपी प्राथमिक कॅमेरा आणि ८ एमपी अल्ट्रावाइड शूटरसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी१६ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ५ हजार ५०० एमएएचची बॅटरी आहे, जी १०० वॅट वायर्ड सुपरव्हीओसी फास्ट चार्जिंगसोबत येते.

WhatsApp channel

विभाग