वनप्लसचा १०८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन खरेदी करण्याच्या विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. अॅमेझॉनवर वनप्लस नॉर्ड सीई ३ लाइट 5G लॉन्चिंग किंमतीपेक्षा स्वस्त मिळत आहे. दरम्यान, या फोनच्या खरेदीवर मिळणारी ऑफर आणि फीचर्सबाबत जाणून घेऊयात.
अॅमेझॉनवर लॉन्चिंग किंमतीपेक्षा ४ हजार ३०० रुपये स्वस्त मिळत आहे. फोन कंपनीने एप्रिल २०२४ मध्ये भारतात वनप्लस नॉर्ड सीई ३ लाइट 5G स्मार्टफोन दोन व्हेरिएंटसह लॉन्च करण्यात आला. लॉन्चिंगच्या वेळी ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १९ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी+ २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये इतकी होती. हे पेस्टल लाइम आणि क्रोमॅटिक ग्रे सारख्या रंगांमध्ये खरेदी केले जाऊ शकते. याचे अपग्रेड मॉडेल वनप्लस नॉर्ड सीई ४ लाइट 5G भारतात दाखल झाल्यानंतर त्यानंतर जुन्या मॉडेलच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे.
सध्या फोनचा ८ जीबी + १२८ जीबी कॉन्फिगरेशन क्रोमॅटिक ग्रे कलर व्हेरियंट अॅमेझॉनवर केवळ १५ हजार ६७० रुपये म्हणजेच लॉन्च किंमतीपेक्षा ४ हजार ३२९ रुपये कमी किंमतीत उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ८ जीबी + १२८ जीबी कॉन्फिगरेशनसह पेस्टल लाइम कलर व्हेरिएंट लॉन्च किंमतीपेक्षा केवळ १५ हजार ६८५ रुपये म्हणजेच ४ हजार ३१४ रुपये कमी किंमतीत उपलब्ध आहे. बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन त्याची किंमत आणखी कमी करता येऊ शकते.
फोन ड्युअल नॅनो सिम सपोर्टसोबत येतो. या फोनमध्ये ६.७२ इंचाचा फुल एचडी प्लस (१०८०×२४०० पिक्सल) एलसीडी डिस्प्ले आहे, जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो आणि २४० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि ६८० निट्स पीक ब्राइटनेससाठी सपोर्ट आहे. स्क्रीनवर गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शन उपलब्ध आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६९५ चिपसेट, ८ जीबी LPDDR4X रॅम देण्यात आला आहे. फोनमध्ये ८ जीबी व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात ईआयएस सपोर्टसह १०८ मेगापिक्सलचा सॅमसंग एचएम ६ मेन सेन्सर, २ मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
फोनमध्ये ६७ वॅट सुपरव्हीओसी फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, फोनची बॅटरी केवळ ३० मिनिटांत ० ते ८० टक्के चार्ज होते.