OnePlus 12 R Price and Specifications: वनप्लस कंपनीचा नवा स्मार्टफोन वनप्लस १२ आर भारतात लॉन्च झाला आहे. वनप्लस कंपनीचा हा मिड रेंज स्मार्टफोन आहे, जो सॅमसंग, रिअलमी, रेडमीसारख्या अनेक स्मार्टफोनशी स्पर्धा करेल. हा स्मार्टफोन टॉप - एंड हार्डवेअरसह येतो. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना उत्तम कॅमेरा सेटअप आणि दमदार बॅटरी मिळत आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊयात.
हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. तर, १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ४५ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन येत्या ६ फेब्रुवारीला भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. आयसीआयसीआय क्रेडीट कार्ड आणि वनकार्डच्या ग्राहकांना वनप्लस १२ आरच्या खरेदीवर १००० रुपयांची सूट मिळत आहे. हा फोन डिव्हाइस ब्लॅक, आयर्न ग्रे किंवा कूल ब्लू अशा तीन रंगामध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये ६.६८ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि २ मेगा पिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळत आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ग्राहकांना १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना ५ हजार ५०० एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन अवघ्या २६ मिनिटात १०० टक्के चार्ज होईल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या