OnePlus 12: इतरांपेक्षा वेगळा लूक आणि भन्नाट फीचर्स, 'या' दिवशी लॉन्च होतोय वनप्लसचा 'हा' धमाकेदार स्मार्टफोन
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  OnePlus 12: इतरांपेक्षा वेगळा लूक आणि भन्नाट फीचर्स, 'या' दिवशी लॉन्च होतोय वनप्लसचा 'हा' धमाकेदार स्मार्टफोन

OnePlus 12: इतरांपेक्षा वेगळा लूक आणि भन्नाट फीचर्स, 'या' दिवशी लॉन्च होतोय वनप्लसचा 'हा' धमाकेदार स्मार्टफोन

Jun 03, 2024 05:08 PM IST

OnePlus 12 Glacial White: वनप्लस १२ ग्लेशिअल व्हाईट कलर व्हेरिएंट ६ जून रोजी भारतात लाँच होणार आहेत. बाजारात हा फोन फ्लोई एमराल्ड आणि सिल्की ब्लॅक या दोन रंगात उपलब्ध आहे.

बाजारात धुमाकूळ घालायला येतोय वनप्लसचा नवा स्मार्टफोन!
बाजारात धुमाकूळ घालायला येतोय वनप्लसचा नवा स्मार्टफोन!

OnePlus Upcoming Smartphones: वनप्लस गेल्या काही दिवसांपासून आपल्या फ्लॅगशिप वनप्लस १२ स्मार्टफोनसाठी नवीन कलर व्हेरियंट लॉन्च करत आहे. आता अखेर कंपनीने वनप्लस १२ ग्लेशिअल व्हाईट हा भारतातील तिसरा लिमिटेड एडिशन कलर व्हेरियंट लाँच करण्याची तारीख जाहीर केली आहे. सध्या भारतात फ्लोई एमराल्ड आणि सिल्की ब्लॅक असे दोनच कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. कलर व्हेरियंटमध्ये नवीन भर घातल्याने युजर्सना त्यांच्या स्टाईल आणि सौंदर्यविषयक आवडी निवडीनुसार डिव्हाइस खरेदी करता येणार आहे.

वनप्लसने अखेर ग्लेशियल व्हाईट नावाच्या नवीन वनप्लस १२ कलर व्हेरिएंटच्या लॉन्चिंगची तारीख जाहीर केली. हा रंग ६ जून रोजी भारतात लाँच होणार आहे. वनप्लस १२ ची ही तिसरी मर्यादित आवृत्ती असेल, जी या आठवड्यात उपलब्ध होईल. मात्र, असाच कलर व्हेरियंट चीनमध्येही उपलब्ध आहे. नवीन व्हेरियंटमध्ये इतर दोन कलर व्हेरियंटसारखेच स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स कायम राहतील.

किंमत

वनप्लस १२ ची सुरुवातीची किंमत ६४ हजार ९९९ रुपये होती आणि समान फीचर्समुळे नवीन कलर व्हेरिएंटच्या किंमतीत कोणताही बदल होणार नाही, असे अपेक्षित आहे. वनप्लस १२ ग्लेशिअल व्हाईट कलरवेमध्ये युजर्ससाठी काय आहे याबद्दल अधिक जाणून घ्या.

वनप्लस १२ ग्लेशियल व्हाईट फीचर्स

वनप्लस १२ मध्ये ६.८२ इंचाचा क्वाड-एचडी+ एलटीपीओ ४.० एमोलेड डिस्प्ले आहे, जो १२० हर्ट्झपर्यंत रिफ्रेश रेट, ४५०० निट्स पीक ब्राइटनेस आणि गोरिल्ला ग्लास व्हिक्टस २ प्रोटेक्शन देतो. या स्मार्टफोनमध्ये १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे.

ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये हॅसलब्लाड संचालित ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टम आहे, ज्यामध्ये सोनी एलवायटी- ८०८ सेन्सरसह ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा देण्यात आले. फोनमध्ये ४८ एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि ३ एक्स ऑप्टिकल झूमसह ६४ मेगापिक्सल पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Whats_app_banner