Amazon Great Indian Festival Sale: अॅमेझॉनवर सुरू असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये वनप्लसचे स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. हेवी स्पेसिफिकेशन असलेला वनप्लस फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल पण बजेट कमी आहे, अशा ग्राहकांसाठी वनप्लस ११ आर परफेक्ट ऑप्शन ठरू शकतो. ग्राहकांना हा फोन १३ हजारांनी स्वस्त मिळू शकतो. या फोनमध्ये कर्व्ह्ड एमोलेड डिस्प्लेसह स्नॅपड्रॅगनचा पॉवरफुल प्रोसेसर, ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि १०० वॅट चार्जिंग सपोर्टसह मोठी बॅटरी मिळत आहे.
हा फोन फेब्रुवारी २०२३ मध्ये ३९ हजार ९९९ रुपयांसह लॉन्च करण्यात आला होता. नवे मॉडेल आल्यानंतर त्याच्या किंमतीतही कपात करण्यात आली. हा फोन जुना असूनही या किंमतीत हा फोन एक उत्तम पर्याय ठरू शकतो. कारण फोनमध्ये हेवी स्पेसिफिकेशन्स मिळतात.
हा फोन ड्युअल सिम (नॅनो) सपोर्टसह येतो आणि यात ६.७४ इंचाचा फुल एचडी प्लस कर्व्ड एमोलेड डिस्प्ले आहे, ज्यात २७७२x१२४० पिक्सल रिझोल्यूशन, १२० हर्ट्झपर्यंत रिफ्रेश रेट आणि १४५० निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन ८+ जेन १ 5G प्रोसेसरसह सुसज्ज आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स८९० प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे, जो डिस्प्लेच्या मध्यभागी पंच होल कटआऊटमध्ये बसवण्यात आला आहे. फोनचा रिअर कॅमेरा ३० एफपीएस (फ्रेम-पर-सेकंद) वर 4K गुणवत्तेचे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो आणि त्याच्या ईआयएस (इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलायझेशन) आणि ओआयएस (ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन) समर्थनामुळे शेक-फ्री व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.
या फोनमध्ये टाइप-सी पोर्ट आणि १०० वॅट सुपरव्हीओसी फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएच बॅटरी आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, फोन १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये दिवसभर चालेल.
संबंधित बातम्या