OnePlus: वनप्लसचं ग्राहकांना मोठं सरप्राइज; 'या' स्मार्टफोनमध्ये मिळतंय एआय फीचर्स
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  OnePlus: वनप्लसचं ग्राहकांना मोठं सरप्राइज; 'या' स्मार्टफोनमध्ये मिळतंय एआय फीचर्स

OnePlus: वनप्लसचं ग्राहकांना मोठं सरप्राइज; 'या' स्मार्टफोनमध्ये मिळतंय एआय फीचर्स

Feb 04, 2024 10:55 PM IST

OnePlus AI features: सॅमसंगसारखे आता वनप्लस कंपनीतही एआय फीचर्स मिळत आहेत.

OnePlus
OnePlus

OnePlus AI Software Updates: वनप्लस कंपनीने त्यांच्या ग्राहकांना मोठा सरप्राइज दिले आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस २४ सीरिजप्रमाणे आता वनप्लस कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये एआय फीचर्स काम करतील. कंपनीने त्यांच्या दोन मॉडेलसाठी एआय फीचर्स अपडेट जारी केला. वनप्लस कंपनीने चीनमध्ये कलरओएस अपडेटच्या माध्यमातून एआय फीचर्स सादर केले आहे.

कंपनीने चीनी स्मार्टफोन बाजारात वनप्लस १२ आणि वनप्लस ११ या दोन मॉडेलसाठी एआय फीचर्स जारी केले आहेत. वनप्लस ११ मध्ये फर्मवेअर व्हर्जन PHB110_14.0.0.403 (CN01) मिळत आहे. तर, वनप्लस १२ मध्ये PJD110_14.0.0.405 (CN01) मिळत आहे. सॅमसंग सारखे एआय फीचर्स नसले तरी वनप्लसने सुरुवातीला तीन जनरेटिव्ह एआय फीचर्स अपडेटमध्ये जोडले आहेत, जे खूप उपयुक्त आहेत.

Realme: ८ हजारांहून कमी किंमतीत मिळतोय जबरदस्त कॅमेरा असलेला फोन; रिअलमी कंपनीची धमाकेदार ऑफर

- सर्व प्रथम एक एआय समराइजर आहे, जो वेळ, स्थान आणि इतर संबंधित तपशीलांसारख्या महत्त्वाच्या माहितीसह फोन कॉल्सचा सारांश तयार करू शकतो.

- दुसरा एआयजीसी रिमूव्हर आहे, एक इमेज एडिटर जो तुम्हाला सॅमसंग आणि गुगल पिक्सेल डिव्हाइसेसवरील एआय फोटो संपादनाप्रमाणेच फोटोंमधून अनावश्यक लोक किंवा गोष्टी डिलीट करतो.

- तिसरा म्हणजे, वनप्लसमध्येआर्टिकल समराइजर फीचर आहे, जे फक्त एका टॅपने आर्टिकल क्विक समरी प्रदान करते.

अपडेट स्क्रीन अॅक्टिव्हिट न करता फिंगरप्रिंट स्कॅनरसह फोन अनलॉक करण्याची क्षमता देखील मिळते. वापरकर्ते आता ऑलव्हेज ऑन डिस्प्लेवर क्यूक्यू म्युजिकला कंट्रोल करू शकतात. याशिवाय, स्टेटस बार या प्लोटिंग विंडोमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवण्याचा पर्याय मिळत आहे.

Whats_app_banner