Ola Roadster electric motorcycle launched In India: ओला इलेक्ट्रिकने आपली इलेक्ट्रिक मोटारसायकल तीन व्हेरिएंटसह भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. रोडस्टर एक्स, रोडस्टर आणि रोडस्टर प्रो अशी त्यांची नावे आहेत. त्यांची किंमत अनुक्रमे ७४ हजार ९९९ रुपये, ०१ लाख ०४ हजार ९९९ रुपये आणि १ लाख ९९ हजार ९९९ रुपये आहे. सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. नवीन इलेक्ट्रिक मोटारसायकलींचे बुकिंग सुरू झाली आहे आणि जानेवारी २०२५ मध्ये डिलिव्हरी सुरू होईल.
ओला रोडस्टर नवीन स्केलेबल आणि मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ओलाने स्पोर्टस्टर आणि एरोहेड या दोन नव्या आगामी मोटारसायकलीही लॉन्च केल्या आहेत. ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीएमडी भाविश अग्रवाल म्हणाले, ‘आज भारतात आम्ही इलेक्ट्रिक मोटारसायकल लॉन्च केली आहे. स्कूटर सेगमेंटमध्ये ईव्ही स्वीकारण्याला गती देण्यात आम्ही आधीच यशस्वी झालो आहोत. ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित करण्यासाठी आम्ही हे पाऊस उचलले आहे. ओला इलेक्ट्रिक मोटारसायकलची बुकींग सुरू झाली असून येत्या जानेवारीपासून डिलिव्हरीला सुरूवात होईल.’
प्रो केवळ १.२ सेकंदात ०-४० किमी / तास वेग पकडते. गेल्या वर्षीच्या संकल्पनेने प्रभावित झालेली त्याची स्ट्रीट नेकेड डिझाइन अधिक व्यावहारिक आणि पारंपारिक शैलीत परिष्कृत करण्यात आली आहे. ही बाईक ताशी १९४ किमीचा टॉप स्पीड देते. ही बाईक सिंगल चार्जवर ५७९ किलोमीटर अंतर गाठेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला. यात एडीएएस आणि १० इंचाचा टचस्क्रीन देण्यात आला आहे. दिवाळी २०२५ पर्यंत या इलेक्ट्रिक बाईकची डिलिव्हरी सुरू होणार आहे, पण बुकींग आजपासून सुरू झाली आहे.
द रोडस्टरची किंमत २.५ किलोवॅट व्हेरिएंटसाठी १ लाख ०४ हजार ९९९ रुपये, ४.५ किलोवॅट व्हेरिएंटसाठी १ लाख १९ हजार ९९९ रुपये आणि ६ किलोवॉट व्हेरिएंटसाठी १ लाख ३९ हजार ९९९ रुपये आहे. या ई-बाईकची डिलिव्हरी पुढील वर्षी जानेवारीमध्ये सुरू होणार असून आजपासून बुकींगला सुरूवात झाली आहे. रोडस्टर २.२ सेकंदात ०-४० किमी प्रतितास वेग पकडू शकते आणि १२६ किमी/तासाचा टॉप स्पीड गाठू शकते. सिंगल चार्जवर ५७९ किलोमीटरची रेंज देईल असा दावा केला जात आहे. या बाईकमध्ये ७ इंचाचा टचस्क्रीन आणि डायमंड कट अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
बजेट-फ्रेंडली व्हेरियंट, रोडस्टर एक्सची किंमत २.५ किलोवॅट बॅटरी पॅकची किंमत ७४ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. रोडस्टर एक्स २.८ सेकंदात ०-४० किमी प्रति तास वेग पकडू शकते, ज्याची टॉप स्पीड १२४ किमी/ तास आणि सिंगल चार्जवर २०० किमीचा दावा आहे. पुढील वर्षी जानेवारीमध्ये डिलिव्हरी सुरू होणार असून आजपासून बुकींगला सुरुवात होणार आहे. या ई-बाइकमध्ये १८ इंचाची अलॉय व्हील्स आणि ४.३ इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे.
याशिवाय, कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीनतम सॉफ्टवेअर अपडेट मूव्हओएस ५ देखील सादर केले आहे आणि घोषणा केली आहे की. ओला मॅप्समध्ये आता ग्रुप नेव्हिगेशनची सुविधा असेल. याव्यतिरिक्त, ओला स्कूटरवर एआय-आधारित टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस) आणि क्रुट्रिम एआय असिस्टंट सादर केले जातील.