Stocks in Focus : ओला इलेक्ट्रिकच्या शेअरनं पकडला रॉकेटचा वेग; एक्सपर्ट्स म्हणतात, भाव १४० रुपयांवर जाणार!-ola electric mobility share price rocketed hsbc gave a target of rs 140 ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks in Focus : ओला इलेक्ट्रिकच्या शेअरनं पकडला रॉकेटचा वेग; एक्सपर्ट्स म्हणतात, भाव १४० रुपयांवर जाणार!

Stocks in Focus : ओला इलेक्ट्रिकच्या शेअरनं पकडला रॉकेटचा वेग; एक्सपर्ट्स म्हणतात, भाव १४० रुपयांवर जाणार!

Aug 16, 2024 10:52 AM IST

ola electric mobility share price : ओला शेअर्ससाठी पहिला सल्ला एचएसबीसीकडून आला, ज्याने खरेदी रेटिंग आणि 140 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह कव्हरेज सुरू केले.

stocks in focus : ओला इलेक्ट्रिकच्या शेअरनं पकडला रॉकेटचा वेग; १४० रुपयांवर जाण्याचा एक्सपर्ट्सचा अंदाज
stocks in focus : ओला इलेक्ट्रिकच्या शेअरनं पकडला रॉकेटचा वेग; १४० रुपयांवर जाण्याचा एक्सपर्ट्सचा अंदाज (Ola Electric IPO)

share market today : शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचा शेअर सातत्यानं वधारत आहे. अवघ्या पाच सत्रात या शेअरमध्ये ६२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या शेअरमधील तेजी आजही कायम असून सकाळच्या सत्रात शेअरनं सुमारे १२ टक्क्यांची झेप घेतली आहे.

ओलाच्या शेअर्ससाठी एचएसबीसीनं प्रथमच शिफारस केली आहे. हा शेअर १४० पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवतानाच तो खरेदी करण्याचा सल्ला एचएसबीसीनं दिला आहे. ओला इलेक्ट्रिकच्या शेअरची आयपीओ किंमत ७६ रुपये होती. त्या किंमतीपासून आतापर्यंत हा शेअर ६२ टक्क्यांनी वाढला आहे. आज सकाळी हा शेअर १२१ रुपयांवर उघडला आणि काही मिनिटांतच १२८.२० रुपयांवर पोहोचला.

…म्हणून हा शेअर गुंतवणुकीयोग्य

सीएनबीसी टीव्ही १८ च्या मते, एचएसबीसी भारतातील ईव्ही क्षेत्र आणि इतर काही गोष्टींबद्दल संकुचित विचारांची आहे, परंतु ओला इलेक्ट्रिकवर तिनं विश्वास दाखवला आहे. ओला इलेक्ट्रिकला असलेले रेग्युलेटरी सपोर्ट, खर्चात कपात करण्याची कंपनीची क्षमता आणि बॅटरी उत्पादनातील सकारात्मक जोखीम लक्षात घेता हा शेअर गुंतवणूक करण्यायोग्य असल्याचं एचएसबीसीचं म्हणणं आहे.

ओला इलेक्ट्रिकनं जूनच्या तिमाहीत केवळ ४९ टक्के इलेक्ट्रिक दुचाकींची विक्रीच केली असं नाही, तर बॅटरीसह भारतातील बहुतेक आवश्यक ईव्ही पार्ट्स बनविण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे, असं ब्रोकरेज कंपनीनं एका नोटमध्ये म्हटलं आहे.

असं असलं तरी एचएसबीसीनं ओलाच्या संदर्भातील अनेक अनिश्चितता देखील निदर्शनास आणल्या आहेत. भारतात होत असलेला ईव्हीचा संथ शिरकाव, तीव्र स्पर्धा आणि बॅटरी उत्पादन जोखीम या गोष्टी अडथळा ठरू शकतात. या अडथळ्यांवर मात करून आर्थिक वर्ष २०२७ -२०२८ पर्यंत ईव्ही उत्पादन खर्च लक्षणीय रित्या कमी होईल, तर उत्सर्जन मानकांमुळं आयसीई स्कूटरची किंमत वाढू शकते, असं एचएसबीसीनं म्हटलं आहे.

बॅटरी उत्पादन प्रकल्पाकडून आशा

ओलाचा बॅटरी निर्मिती उपक्रम यशस्वी होईल. त्यामुळं आयात केलेल्या बॅटरीच्या किंमतीतच ओला बॅटरी तयार करू शकेल. जागतिक दर्जाची बॅटरी ही कंपनी तयार करेल. या बॅटरीवरील खर्च प्रति किलोवॅट सुमारे १५ ते २० डॉलर कमी असेल, असा विश्वास ब्रोकरेजनं व्यक्त केला आहे.

कंपनीचा तिमाही निकाल कसा आहे?

बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर ओला इलेक्ट्रिकनं निकाल जाहीर केला. कंपनीचा निव्वळ तोटा गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर एबिटडा तोटा गेल्या वर्षीच्या २१८ कोटी रुपयांच्या तुलनेत २०५ कोटी रुपयांवर स्थिर आहे. कंपनीनं गुरुवारी, १५ ऑगस्ट रोजी 'रोडस्टर' सीरिज लाँच करून इलेक्ट्रिक मोटारसायकल सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. या बाईकची किंमत ७५,००० रुपयांपासून सुरू होईल आणि २.५ लाख रुपयांपर्यंत जाईल.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांच्या शिफारशी, सूचना आणि मतं ही त्यांची स्वतःची आहेत, हिंदुस्तान टाइम्स मराठीची नाहीत. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचा सल्ला घ्या. )

विभाग