Dividend News : सुट्टीच्या दिवशी सरकारी कंपनीनं जाहीर केला घसघशीत डिविडंड; तुमच्याकडं आहे का शेअर?-oil india ltd announced dividend record date before 20 march details ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Dividend News : सुट्टीच्या दिवशी सरकारी कंपनीनं जाहीर केला घसघशीत डिविडंड; तुमच्याकडं आहे का शेअर?

Dividend News : सुट्टीच्या दिवशी सरकारी कंपनीनं जाहीर केला घसघशीत डिविडंड; तुमच्याकडं आहे का शेअर?

Mar 08, 2024 05:47 PM IST

Dividend News : सरकारी कंपनी ऑइल इंडिया लिमिटेडनं आपल्या गुंतवणूकदारांना लाभांशाची भेट दिली आहे.

सुट्टीच्या दिवशी सरकारी कंपनीनं जाहीर केला घसघशीत डिविडंड; तुमच्याकडं आहे का शेअर?
सुट्टीच्या दिवशी सरकारी कंपनीनं जाहीर केला घसघशीत डिविडंड; तुमच्याकडं आहे का शेअर?

oil india ltd announced dividend : महाशिवरात्रीच्या निमित्तानं शेअर बाजार बंद असताना गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आली आहे. सरकारी कंपनी ऑइल इंडिया लिमिटेडनं लाभांश देण्याची घोषणा केली आहे. या लाभांशाची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. 

ऑइल इंडिया लिमिटेडनं एक्स्चेंजला या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार कंपनीनं लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक पात्र गुंतवणूकदाराला १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर ८.५० रुपये अंतरिम लाभांश दिला जाणार आहे. त्यासाठी १८ मार्च २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. पुढील महिन्यात ७ एप्रिलपर्यंत हा डिविडंड गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित आहे.

ऑइल इंडियाच्या शेअरची घोडदौड

ऑइल इंडियाचा शेअर सध्या जोमानं वाटचाल करत आहे. गुरुवारी कंपनीच्या एका शेअरची किंमत ६३०.१० रुपये प्रति शेअर होती. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, मागच्या तीन महिन्यांत या शेअरनं गुंतवणूकदारांना जवळपास १०० टक्के परतावा दिला आहे. गेल्या ६ महिन्यांत कंपनीचा शेअर एनएसईवर १२३ टक्क्यांनी वाढला आहे.

ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापासून ऑइल इंडियाचा शेअर होल्ड केला आहे, त्यांना आतापर्यंत तब्बल १३५ टक्क्यांहून अधिक नफा झाला आहे. डिसेंबर २०२३ च्या शेअर होल्डिंगनुसार, कंपनीमध्ये सरकारची एकूण भागीदारी ५६.७ टक्के आहे.

काय करते कंपनी?

ऑइल इंडिया लिमिटेड ही एक केंद्र सरकारी कंपनी आहे. ही कंपनी खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्खनन व वाहतुकीच्या व्यवसायात आहे. कंपनीची मार्केट कॅप ६८ हजार कोटी असून कंपनीचं मुख्यालय नोएडा इथं आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग