national stock exchange alert for investors : तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल आणि गुंतवणूक करण्यासाठी कोणत्याही सोशल मीडिया ग्रुपवरील व्हिडिओ किंवा गुंतवणूकदारांचा सल्ला घेत असाल तर सावध राहा. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना गंभीर इशारा दिला आहे. NSE ने गुंतवणूकदारांना काही इंस्टाग्राम आणि टेलिग्राम चॅनेलपासून सावध राहण्यास सांगितले आहे जे चुकीचे गुंतवणूक सल्ला आणि ट्रेडिंगबाबत अवैधरित्या सेवा देत आहेत.
तुम्ही 'सुरक्षित/निश्चित' किंवा हमीपरताव्याचे आश्वासन देणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेकडून गुंतवणुकीचा सल्ला घेऊ नये. याशिवाय, तुमची ट्रेडिंग क्रेडेंशियल्स जसे की यूजर आयडी/पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. तुम्ही NSE वेबसाइटवर 'नो युवर स्टॉक ब्रोकर' या सुविधेचा वापर करून नोंदणीकृत स्टॉक ब्रोकरमार्फतच व्यापार करावा.
एनएसईने स्पष्ट केले आहे की ते अशा व्यक्ती आणि संस्थांवर कायदेशीर कारवाई करेल जे बेकायदेशीर कामात सहभागी आहेत. सोशल मीडियावर गुंतवणूक सल्ला शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही चेतावणी महत्त्वाची आहे. विश्वासार्ह स्त्रोतांकडूनच माहिती मिळवा आणि कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी स्वतःचे संशोधन करा व त्यानंतर गुंतवणूक करा.
सोशल मीडिया साईट यूट्यूब, टेलिग्राम इंस्टाग्रामवर गुंतवणूक तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी या बाबत सल्ले देणारे चॅनल आणि स्वयंमघोषित तज्ञ आहेत. त्यांची विश्वासहर्ता देखील नसते. असे लोक अनेक भूलथापा मारून नागरिकांना गंडवत असल्याचे प्रकार देखील समोर आहे आहे. त्यामुळे तुमच्या स्वकमईचा पैसा जर योग्य पद्धतीने गुंतवायचा असेल तर योग्य गुंतवणूक सल्ले देणाऱ्या कंपनीकडे जावे. तसेच बाजाराचा योग्य अभ्यास करून गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्यावे असे देखील एनएसईने म्हटले आहे.