गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी, एनएसई-बीएसईने व्यवहार शुल्कात केला बदल
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी, एनएसई-बीएसईने व्यवहार शुल्कात केला बदल

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी, एनएसई-बीएसईने व्यवहार शुल्कात केला बदल

HT Marathi Desk HT Marathi
Published Sep 27, 2024 10:16 PM IST

भारतीय प्रतिभूति व विनिमय मंडळाने (सेबी) शेअर बाजारासह बाजारातील पायाभूत संस्थांच्या सदस्यांसाठी एकसमान शुल्क रचना बंधनकारक केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सेन्सेक्स
सेन्सेक्स (Photo-Reuters)

जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. देशातील प्रमुख शेअर बाजार - बीएसई आणि एनएसईने शुक्रवारी रोख आणि फ्युचर्स आणि ऑप्शन डील्ससाठी त्यांच्या व्यवहार शुल्कात सुधारणा केली आहे. सुधारित दर १ ऑक्टोबरपासून लागू होतील, असे एक्स्चेंजएक्स्चेंजने स्वतंत्र परिपत्रकात म्हटले आहे. भारतीय प्रतिभूति व विनिमय मंडळाने (सेबी) शेअर बाजारासह बाजारातील पायाभूत संस्थांच्या सदस्यांसाठी एकसमान शुल्क रचना बंधनकारक केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

बीएसईने इक्विटी फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये सेन्सेक्स आणि बँकेक्स ऑप्शन कॉन्ट्रॅक्टसाठी ट्रान्झॅक्शन चार्जेस मध्ये सुधारणा करून 3,250 रुपये प्रति कोटी प्रीमियम केला आहे. तथापि, इक्विटी फ्युचर्स आणि ऑप्शन श्रेणीतील इतर करारांचे व्यवहार शुल्क कायम राहणार आहे. मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन्सकडून (एमआयआय) आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत सेबीने जुलैमध्ये परिपत्रक जारी केले होते. त्यात म्हटले आहे की एमआयआयमध्ये व्यवसायाच्या विद्यमान व्हॉल्यूम आधारित प्रणालीऐवजी सर्व सदस्यांसाठी एकसमान शुल्क रचना असावी.

Whats_app_banner