Tomato on Paytm : काय सांगता, 'स्वस्त' टोमॅटो आता मिळणार पेटीएमवर, या शहरातील ग्राहकांना मिळणार लाभ, जाणून घ्या ताजे भाव
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tomato on Paytm : काय सांगता, 'स्वस्त' टोमॅटो आता मिळणार पेटीएमवर, या शहरातील ग्राहकांना मिळणार लाभ, जाणून घ्या ताजे भाव

Tomato on Paytm : काय सांगता, 'स्वस्त' टोमॅटो आता मिळणार पेटीएमवर, या शहरातील ग्राहकांना मिळणार लाभ, जाणून घ्या ताजे भाव

Updated Jul 26, 2023 03:09 PM IST

Tomato on Paytm : जर तुम्ही घरबसल्या स्वस्त टोमॅटो खरेदी करु इच्छित आहात कर या सुविधेचा लाभ पेटीएमवरही घेता येईल. कारण इथेही स्वस्त आहेत.

tomato HT
tomato HT

Tomato on Paytm : टोमॅटोच्या रेकाॅर्डब्रेक किंमतींपासून दिलासा देण्यासाठी सरकारनंतर आता प्रायव्हेट प्लेयर्सही थेट मैदानात उतरले आहेत. सरकारकडून अनेक शहरांमध्ये सध्या स्वस्त दरात टोमॅटो उपलब्ध करुन दिले जात आहेत. पण आता घर बसल्या आँनलाईन आॅर्डर करुनही स्वस्तात टोमॅटो खरेदी करता येणार आहे. यासाठी पेटीएमने ओएनडीसी आणि एनसीसीएफसोबत करार केला आहे.

सध्या बहुतांश ठिकाणी किरकोळ बाजारात टोमॅटो १०० रुपये किलोपेक्षा जास्त दराने विकले जात आहेत. काही ठिकाणी तर त्याचे दर किलोमागे २५० रुपयांपेक्षाही पुढे गेले आहे. अशा स्थितीत टोमॅटो सवलतीच्या दरात उपलब्ध झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, सवलतीच्या दरात टोमॅटो खरेदी करण्याची सुविधा सर्वत्र उपलब्ध करण्यात आलेली नाही.

पेटीएमने लढवली शक्कल

पेटीएम ई काॅमर्स प्रायव्हेट लिमिटेडने दिल्ली एनसीआरमध्ये ७० रुपये प्रति किलो दराने टोमॅटो विक्रीसाठी ओएनडीसी आणि एनसीसीएफसह करार केला आहे. त्याशिवाय दिल्ली - एनसीआरचे ग्राहक पेटीएम अॅपच्या माध्यमातूनही स्वस्तात टोमॅटो खरेदी करु शकतात. त्यासाठी अट एकच आहे. ती म्हणजे ७० रुपये सवलतीच्या दरात एका व्यक्तीला दोन किलो टोमॅटो खरेदी करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

आॅफलाईन स्टोअरमधील दर

दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, फरीदाबादमध्ये अनेक ठिकाणी लोक मोबाईल व्हॅनद्वारे स्वस्तात टोमॅटो खरेदी करत आहेत. या स्टॉल्सवर पूर्वी ९० रुपये किलो दराने टोमॅटो मिळत होता, तो आता ७० रुपये किलोवर आला आहे. त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळावा यासाठी सवलतीच्या दरात ऑनलाइन विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Whats_app_banner