TATA No. 1- भारताची टाटा कंपनी 'या' उद्योगक्षेत्रात ठरली जगात नंबर वन
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  TATA No. 1- भारताची टाटा कंपनी 'या' उद्योगक्षेत्रात ठरली जगात नंबर वन

TATA No. 1- भारताची टाटा कंपनी 'या' उद्योगक्षेत्रात ठरली जगात नंबर वन

Jun 19, 2024 12:50 PM IST

Hotel Taj Story: टाटांनी त्यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बांधलेले ताज हॉटेल आज जगातील टॉप-१० सर्वात मजबूत हॉटेल ब्रँडमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे.

टाटांचा जगांत डंका! ताज बनला जगातील सर्वात मजबूत हॉटेल ब्रँड! अखेर घेतला अपमानाचा बदला; वाचा
टाटांचा जगांत डंका! ताज बनला जगातील सर्वात मजबूत हॉटेल ब्रँड! अखेर घेतला अपमानाचा बदला; वाचा

Hotel Taj number brand in hotel industry in the world : आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी जमशेदजी टाटा यांनी मुंबईत उभारलेले हॉटेल ताज व  ताज हॉटेल ब्रँड जगभरातील हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पहिल्या क्रमांकाचा ठरला आहे. मजबूत ब्रँड म्हणून ‘ताज’ची नवी ओळख तयार झाली आहे. जागतिक आकडेवारीनुसार, ताजचे नाव टॉप-१० सर्वात मजबूत हॉटेल ब्रँडमध्ये सर्वात वर आहे. तर अमेरिकन हॉटेल्स दुसऱ्या ते पाचव्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेचे रेनेसान्स हॉटेल दुसऱ्या क्रमांकावर तर डबल ट्री हॉटेल ब्रँड हा तिसऱ्या क्रमांकावर आहे, एम्बेसी स्वीट्स चौथ्या क्रमांकावर आहे आणि मॅरियट पाचव्या क्रमांकावर आहे.

सहाव्या क्रमांकावर चीनमधील शांघायमधील हँटिंग हॉटेल आहे. चीननेही सातवे स्थान पटकावले आहे. येथे जेआय हॉटेल ब्रँडने हे स्थान पटकावले आहे. अमेरिकन हॉटेल हिल्टनने ८ व्या तर हाँगकाँगचे शांग्री-लाने ९ व्या जागेवर स्थान मिळवले आहे. तर स्वीडनचे स्कँडिक हॉटेल्स १० व्या स्थानावर आहे.

अपमानाचा बदला घेण्यासाठी उभारण्यात आले होते हॉटेल ताज

भारतातील सर्वात मोठे आणि महागडे हॉटेल म्हणून हॉटेल ताजची गणना होते. हे हॉटेल आता फक्त भारतातच नाही तर जगातील सर्वात लोकप्रिय ५ स्टार हॉटेल आहे. या हॉटेलला २६/११ च्या हल्ल्यालाही सामोरे जावे लागले आहे. टाटा समूहाच्या जेआरडी टाटा यांनी ताज हॉटेल बांधले. या हॉटेलचे उद्घाटन १६ डिसेंबर १९०३ रोजी झाले. भारतातील अनेक शहरांमध्ये टाटा समूहाची अनेक हॉटेल्स बांधली गेली असली, तरी मुंबईतील ताज हॉटेलच्या बांधकामाची व हॉटेल उभारणीची कहाणी अतिशय रंजक आहे.

हॉटेल ताज का बांधले गेले?

एकदा जेआरडी टाटा ब्रिटनला गेले होते. ते भारतीय असल्यामुळे त्याला तेथील वॉटसन हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी नव्हती. या हॉटेलमध्ये फक्त ब्रिटिशांनाच प्रवेश होता. तेव्हाच त्यांनी ठरवले की ते एक असे हॉटेल टायर करणार ज्यात केवळ भारतीयच नाही तर जगभरातील लोक या हॉटेलकडे पाहत राहतील. या हॉटेलमध्ये अमेरिकन पंखे, तुर्कीवरून आलेल्या खास मार्बलने येथील बाथरूम तयार करण्यात आले आहेत. तर जर्मन लिफ्ट व इंग्लिश बटलर असलेले हे भारतातील पहिले हॉटेल होते. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय डिस्कोथेकही येथेच बांधले गेले. हे हॉटेल उभारून टाटा यांनी ब्रिटिशांनी केलेल्या अपमानाचा बदला घेतला. आज हेच हॉटेल जगात हॉटेल ब्रॅंडमध्ये आता नंबर वन ठरले आहे.

सिंगल रूमचे भाडे पूर्वी होते १० रुपये

एकेकाळी ताज हॉटेलमधील एका खोलीचे भाडे १० रुपये होते. तर पंखे आणि संलग्न बाथरूमचे भाडे १३ रुपये असायचे. आज एकाच हॉटेलमध्ये एका दिवसाच्या मुक्कामासाठी किमान २५ हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात.

Whats_app_banner