ITR filing on Mobile : आयकर विभागाने करदात्यांसाठी सुधारित संकेतस्थळ जारी केले आहे. यात अनेक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने टॅक्स पेमेंट आणि आयकर रिटर्न्स भरणे पहिल्यापेक्षा आता अधिक सोईचे होणार आहे. ही सुविधा मोबाईलवरूनही आता अत्यंत सोप्प्या पद्धतीने करता येईल. आयकर विभागासाठी या संकेतस्थळाला सीबीडीटीने डिझाईन केलं आहे.
आयकर विभागाच्या मते हे संकेतस्थळ त्याप्रमाणेच डिझाईन करण्यात आले आहे. ज्यामुळे यूजर्सला एका क्लिकवरच सर्वच कामे करता येतील. या संकेतस्थळाच्या इंटरफेस आणि नॅव्हिगेशनमध्ये सुधारणा केली आहे. त्यासह संकेतस्थळात एक लेटेस्ट अपडेटचा काॅलमही देण्यात आला आहे. या काॅलममध्ये करदात्यांना आयकर विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या सर्व सुचनांची माहिती यात मिळेल. या संकेतस्थळावर मेगा मेन्यू नावाचा पर्यायही देण्यात आला आहे.यात पेनल्टी, आयकर रिटर्न्स फाॅर्म्स, टॅक्स कॅलेंडरसारख्या आयकराशी संबंधित सर्व लिंक्सचा समावेश आहे.
नव्या पोर्टलला मोबाईलनुसार डिझाईन केले आहे. मोबाईल उघडताच एक बटन संकेच तर दुसरीकडे इतर माहिती जसे की ई व्हेरिफाईड सिस्टिम, लिंक आधार स्टेट्स, आयकर रिटर्न्स स्टेट्ससारखे काॅलम देण्यात आले आहेत. यामुळेच आता करदात्यांना मोबाईलवरून आयटीआर भरणे सोप्पे होणार आहे. समजा एखाद्याला यासंदर्भात काही शंका असल्यास व्हिडिओ पाहून तुमच्या सर्व शंकांचं निरसन करता येईल. हा व्हिडिओ संकेतस्थळावरच आहे.