Nothings CMF Phone 1 Launches: नथिंग कंपनीचा सब-ब्रँड सीएमएफ लॉन्च झाला आहे. आता या ब्रँडने आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च केला आहे, ज्याचे नाव सीएमएफ फोन १ आहे. हा फोन वेगळ्या डिझाईनसह भारतात लॉन्च झाला आहे. हा फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार असून किंमत लीकच्या रिपोर्टनुसार, फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये असण्याची शक्यता आहे. हा फोन बाजारात लॉन्च होण्यापूर्वी त्याची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी असेल असे सांगितले जात होते.
सीएमएफ फोन १ मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७३०० चिपसेट असेल, जो ८ जीबी रॅम (अतिरिक्त 8 जीबी रॅम बूस्टर) सह जोडला जाईल. फोनमध्ये सुपर एमोलेड डिस्प्ले असेल आणि मागील बाजूस ड्युअल लेन्स कॅमेरा सेटअप असेल. त्यातील एक कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा असेल, त्याची लेन्स सोनी कंपनीची असेल. सीएमएफ फोन १ बाय नथिंगचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा फोन वेगवेगळ्या रंगात बजारात दाखल होणार आहे, यामुळे ग्राहकांना कलर ऑप्शन मिळणार आहे.
कंपनीने कॅरींग स्ट्रॅप आणि किकस्टँड सारख्या अॅक्सेसरीज दर्शविणारी फोटो सामायिक केली, जी हँड-फ्री वापरासाठी आहेत. मात्र, या अॅक्सेसरीजचा समावेश केला जाणार की स्वतंत्रपणे विक्री केली जाणार याची अद्याप पुष्टी झालेली नाही. सीएमएफ बाय नथिंग फोन 1 कोणत्या रंगात उपलब्ध असेल? सीएमएफ फोन १ चार रंगांमध्ये उपलब्ध असेल. ज्यात ब्लॅक (टेक्स्चर्ड केस), ऑरेंज (व्हेगन लेदर फिनिश), लाइट ग्रीन (टेक्सचर्ड केस) आणि ब्लू (व्हेगन लेदर फिनिश) यांचा समावेश असेल.
येत्या १८ एप्रिलला नथिंगचे नवे प्रॉडक्ट लाँच होणार आहे. याआधी कंपनीने कोणते प्रॉडक्ट लाँच करणार याचा खुलासा केला नव्हता, पण आता कंपनीने सस्पेन्स संपवला आहे. नथिंग इअर आणि नथिंग इअर (ए) ही दोन नवीन ऑडिओ उत्पादने लाँच करण्याची घोषणा खुद्द नथिंगनेच केलेली नाही. हे डिव्हाइस १८ एप्रिल रोजी भारत आणि जागतिक बाजारपेठेत लाँच केले जातील. विशेष म्हणजे ए-सीरिजसोबत येणारे नथिंग इअर (ए) हे पहिले ऑडिओ प्रॉडक्ट असेल. कंपनीने नुकताच आपला पहिला 'ए' सीरिजचा स्मार्टफोन नथिंग फोन (२ ए) लाँच केला आहे.